आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाँगकाँगमधील एका व्यक्तीला कोरोनातून ठीक झाल्यानंतर आता परत संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. हे जगातील पहिले कोरोना रि-इंफेक्शनचे प्रकरण आहे.
कोरोनातून ठीक झाल्यानंतरही परत कोरोना संक्रमण झाल्यामुळे इम्युनिटीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरुवातील संशोधक सांगत होते की, कोरोनातून ठीक झाल्यानंतर त्या व्यक्तीला परत कोरोना होऊ शकत नाही.
लवकर होऊ शकते रि-इंफेक्शन
या प्रकरणावर रिसर्च करणाऱ्या हाँगकाँग यूनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायोलॉजिस्ट केल्विन काय-वेंगचे म्हणने आहे की, आमची रिसर्च हे सांगते की, कोव्हिड-19 च्या संक्रमणानंतर तयार झालेली इम्युनिटी आयुष्यभर राहत नाही. तर रि-इंफेक्शन परत लवकर होऊ सकते. कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना परत लक्षणे दिसत असल्यात त्यांनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी.
असे समोर आले हाँगकाँगचे प्रकरण
33 वर्षीय वर्षीय व्यक्तीमध्ये स्क्रीनिंगनंतर संक्रमण झाल्याची पुष्टी झाली. तो या महिन्यात यूरोपवरुन परत आला होता आणि हाँगकाँग एअरपोर्टवर स्क्रीनिंगदरम्यान पीसीआर टेस्ट झाली. हे प्रकरण चकीत करणारे होते की, कारण साडे चार महिन्यापूर्वीच तो व्यक्ती कोरोनातून बरा झाला होता. या व्यक्तीच्या अंगातील रोगप्रतिकार शक्ती संपुष्टात आल्याची बोलल जात आहे.
रिकव्हरी झाल्यानंतरही मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे
मायक्रोबायोलॉजिस्ट केल्विन काय-वेंगनुसार, कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांनी असा विचार करुन नये की, यापुढे त्यांना संक्रमण होणार नाही. ठीक झाल्यानंतरही मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
परत संक्रमण कसे झाले, हे जीनोम कोडिंगमधून समजून घेण्याचा प्रयत्न सुरू
परत संक्रमण कसे झाले, हे हॉन्गकॉन्ग यूनिव्हर्सिटीमधील संशोधक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी कोरोना व्हायरसच्या दोन स्ट्रेनची जेनेटिक कोडिंगचे विश्लेषण केले जात आहे. यातील पहिल्या व्हायरसचे सँपल मार्च-एप्रिलमध्ये घेतले गेले आहेत आणि दुसरा स्ट्रेन यूरोपमधून जून-जूलैदरम्यान घेतलेले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.