आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Updates | World Health Organization (WHO) Coronavirus Transmission Latest News Updates; Scientists Claim, Corona Can Spread By Air

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर नवा दावा:32 देशांचे 239 शास्त्रज्ञ म्हणाले - हवेतूनही होतो कोरोनाचा संसर्ग, डब्ल्यूएचओकडे नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याची केली मागणी

वॉशिंग्टन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, हवेतून कोरोना संसर्ग पसरण्याचे अद्याप ठोस पुरावे मिळाले नाहीत

हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होतो. द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. त्यांनी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र (सीडीसी) यांना पत्र लिहून या दाव्यांचा अभ्यास करून मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.

याआधी डब्ल्यूएचओने सांगितले होते की, हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरत नाही, हे केवळ थुंकीच्या कणांद्वारे पसरते. हे कण कफ, शिंका आणि बोलण्यामुळे शरीरातून बाहेर पडतात. ते इतके हलके नाहीत की ते वा वाऱ्यासोबत दुरपर्यंत उडत जातात. ते लवकरच जमिनीवर पडतात. 

घरी देखील एन -95 मास्क घालणे आवश्यक 

रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांनी या संदर्भात डब्ल्यूएचओला एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले की, शिंकल्याने, खोकलल्याने किंवा मोठ्याने बोलल्यामुळे संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून निघालेले छोटे ड्रॉपलेट्स  हवेमध्ये तरंगून निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो. अशात घरात देखील एन-95 मास्क घालणे आवश्यक आहे.

डब्ल्यूएचओने अद्याप हा दावा स्वीकारला नाही

डब्ल्यूएचओच्या तांत्रिक टीमचे प्रमुख डॉ. बेनेडेटा अलेग्रंजी या दाव्यावर म्हटले की, "गेल्या काही महिन्यांत आम्ही बर्‍याचदा असे म्हटले की हवेतून संसर्ग पसरणे शक्य आहे, परंतु अद्यापपर्यंत याबाबत ठोस पुरावे मिळाले नाहीत." डब्ल्यूएचओने 29 जून रोजी आपली मार्गदर्शक सूचना अद्ययावत केली होती. या म्हटले होते की, केवळ वैद्यकिय प्रक्रियेद्वारे हवेतून संसर्ग शक्य आहे. जे 5 मायक्रॉन पेक्षा छोटे ड्रॉपलेट्स निर्माण करतात. एक मायक्रॉन एक सेंटीमीटरचा 10 हजारावा भाग असतो. ।

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser