आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग / चीनमध्ये बायोटेक कंपनी सिनोव्हेट कोरोना व्हायरस व्हॅक्सिन बनवण्यात अंतिम टप्प्यात पोहोचली आहे परंतु त्यांना ट्रायलसाठी रुग्ण भेटत नाहीयेत. कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी बनलेले व्हॅक्सिन 99 टक्के प्रभावी ठरेल. बायोटेक कंपनी सिनोव्हेटने व्हॅक्सिनचे 100 मिलियन डोस तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
व्हॅक्सिनचे नाव ठेवले 'कोरोनावेक'
अकॅडमीक जर्नल सायन्समध्ये प्रकाशित शोधानुसार, कंपनीने व्हॅक्सिनचे नाव 'कोरोनावेक' ठेवले आहे. ट्रायलमध्ये हे व्हॅक्सिन माकडांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवल्याचे आढळून आले आहे. संशोधकांनुसार पुढील ट्रायलसाठी चीनमध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या कमी होणे ही सर्वात मोठी समस्या आहे.
तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ब्रिटनसोबत चर्चा सुरु
कंपनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल करत असून यामध्ये 1 हजार स्वयंसेवकांचा सहभाग आहे. व्हॅक्सिनचे तिसरे ट्रायल ब्रिटनमध्ये केले जाणार असून यासाठी चर्चा सुरु आहे. संशोधक लुओ बायशन यांच्यानुसार, हे व्हॅक्सिन 99 टक्के प्रभावी ठरेल.
हाय रिस्क झोनमध्ये प्राथमिकता
कंपनीचे सिनिअर डायरेक्टर हेलेन येंग सांगतात, 'आम्ही तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ब्रिटन आणि युरोपीय देशांसोबत चर्चा करत आहोत. सध्या ही चर्चा प्राथमिक स्तरावर सुरु आहे. वॅक्सीन प्रोडक्शनपूर्वी रिसर्च पूर्ण होणे आवश्यक आहे. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर अप्रूव्हल घेऊन हाय रिक्स असलेल्या झोनमध्ये सर्वात पहिले व्हॅक्सिन पोहोचवले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.