आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Vaccine Update; China Coronavirus Disease Vaccine Latest Update On Chinese Scientists Over (COVID 19) Treatment Ressearch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हायरसचा उपचार:चीनच्या लॅबचा दावा- नवीन औषधाच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी, लवकरच मानवी चाचण्या केल्या जातील

बीजिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशोधकांनी म्हटले- हे औषध व्हायरसशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

चीनच्या एका लॅबचा दावा आहे की, कोरोना व्हायरसचा सामना करणारे औषध बनवत आहेत. संशोधकांचे म्हणने आहे की, या औषधामुळे फक्त रुग्णच ठीक होणार नाही, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवते.

शास्त्रज्ज्ञांनी या औषधाच्या चाचण्या चीनच्या पेकिंग यूनिव्हर्सिटीमध्ये करत आहेत. चीनमधील रुग्ण ठीक होत असल्यामुळे या औषधाचे मानवी परीक्षण ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशात केले जाईल. कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाली, नंतर हळु-हळू हा व्हायरस संपूर्ण जगात पसरला. सध्या जगभर या व्हायरसच्या औषधावर संशोधन केले जात आहे.

प्राण्यांवरील परीक्षण यशस्वी

यूनिव्हर्सिटीच्या बीजिंग अॅडवांस्ड इनोवेशन सेंटर फॉर जीनोमिक्सचे संचालक सन्नी झीने न्यूज एजेंसी एएफपीला सांगितले की, या औषधाचे प्राण्यांवरील परीक्षण यशस्वी झाले आहे. जेव्हा आम्ही एका संक्रमित उंदरात न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडी इंजेक्ट किले, तेव्हा 5 दिवसानंतर वायरल लोड 2500 पर्यंत कमी झाला. याचा अर्थ असा की, या औषधाची चाचणी यशस्वी झाली आहे. हे औषध न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडीचे वापर करुन, शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. झीच्या टीमने 60 ठीक झालेल्या रुग्णांच्या शरीरातून अँटीबॉडी काढल्या आहेत.

अँटीबॉडीच्या वापराने कोरोनावरील उपचार शक्य

टीमची रिसर्च रविवारी एक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली. यात म्हटले आहे की, अँटीबॉडीच्या वापराने कोरोनावरील उपचार शक्य आहे. तसेच, यामुळे रिकव्हरी टाइमदेखील कमी होतो. अँटीबॉडीसाठी झीची टीम दिवसरात्र काम करत आहे.

‘एक लस बनवण्यासाठी 12 ते 18 महीने लागू शकतात’

त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, न्यूट्रिलायज्ड अँटीबॉडी महामारीच्या उपचारात महत्वाची ठरेल. तसेच, मागच्या आठवड्यात एका आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले की, चीनमध्ये पाच व्हॅक्सीनची मानवी चाचणी सुरू आहे. तर, डब्ल्यूएचओचे म्हणने आहे की, लस तयार करण्यासाठी 12 ते 18 महीन्यांचा वेळ लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...