आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Vaccine Update; Narendra Modi Government Fast Track Emergency Approvals For Foreign Covid 19 Vaccines; News And Live Updates

भारताला मिळणार जगातील सर्व लसी:जगभर ज्या लसींचा वापर होतोय, त्या लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत हा जगातील 60 वा असा देश आहे ज्याने 'स्पुतनिक-व्ही' लसीला वापरासाठी मंजुरी दिली आहे.

देशातील लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे. त्या सर्व लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे. यामध्ये यूएस फूड अ‍ॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके, पीएमडीए, एमएचआरए आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या सर्व लसींचा समावेश आहे. यापुर्वी देशात रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

एका दिवसापूर्वी देशाला तिसरी लस मिळाली
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) आणि भारतातील तज्ञ समितीने रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. आपापर्यंत भारतातील लसीकरण अभियानातील ही तिसरी लस आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने सांगितले की, भारत हा जगातील 60 वा असा देश आहे ज्याने 'स्पुतनिक-व्ही' लसीला वापरासाठी मंजुरी दिली आहे.

16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात
भारत देशात लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून झाली असून यामध्ये कोविशिल्ड आण‍ि कोवॅक्सिन या लसीचा वापर केला जात होता. कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुणे येथील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया करीत आहे. याला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रॅजेनेकाने याची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे, कोवॅक्सिनला भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)ने तयार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...