आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus Variant Omicron Outbreak World LIVE Updates| France NEWYORK, WASHINGTON, CANADA Reported Cases And Deaths By COUNTRY Wise

कोरोना जगात:24 तासात 21.89 लाख नवीन केस, दररोज सापडत आहेत 20 लाखांपेक्षा जास्त संक्रमित

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात जगभरात 21 लाख 89 हजार नवीन कोरोना संक्रमित आढळले आहेत आणि 4,771 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी जगभरात 26.96 लाख नवीन केस मिळाल्या होत्या आणि 6,369 लोकांचा मृत्यू झाला होता.

शनिवारी अमेरिकेत पुन्हा सर्वात जास्त 4 लाख 68 हजार केस समोर आल्या. तर फ्रान्समध्ये 3.03 लाख, इटलीमध्ये 1.97 लाख, भारतात 1.59 लाख, ब्रिटेनमध्ये 1.46 लाख , ऑस्ट्रेलियामध्ये 1.15 लाख आणि अर्जेंटीनामध्ये 1.01 लाख नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर पूर्ण जगात कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा 55 लाखांच्या पार झाला आहे.

जगभरात आतापर्यंतची स्थिती

  • एकूण संक्रमित : 30.59 कोटी
  • बरे झाले : 25.89 कोटी
  • अॅक्टिव्ह केस : 4.15 कोटी
  • एकूण मृत्यू : 55.02 लाख

10 दिवसांमध्ये जगात दुप्पट झाले कोरोना रुग्ण
कोरोनाच्या वेगाच्या संदर्भात एका अहवालानुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, कोरोनाचे दररोजचे आकडे सरासरी 20 लाखांहून अधिक नोंदवले गेले आहेत.

AFP च्या आकड्यांनुसार, 1 ते 7 जानेवारीच्या दरम्यान दररोज जवळपास 21 लाख 6 हजार 118 प्रकरणे समोर आली. यापूर्वी 23 ते 29 डिसेंबरच्या आठवड्यात दररोज जवळपास 10 लाख कोरोनाचे रुग्ण सापडत होते. जवळपास 10 दिवसात प्रकरणे दुप्पट वाढली आहेत. यामुळे कोरोनाच्या वाढत्या धोक्याचा अंदाज येतो.

नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवसांमध्ये दक्षिण अफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट मिळाल्यानंतरपासून कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये 270% पर्यंत वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...