आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना जगात:मागील 24 तासांत 31.45 लाख रुग्ण आढळले, 2.35 लाखांची वाढ; जगातील नवीन मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

मागील 24 तासांत जगात 31.45 लाख नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. 10.64 लाख लोक कोरोनामुक्त झाले असून 8032 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णात अमेरिका 8.14 लाख रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर तर 3.61 लाख रुग्णांसह फ्रान्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी 2.46 लाख नवीन रुग्णांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जगात 2.35 लाख नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी जगभरात 29.10 लाख नवे संक्रमित आढळले. एकट्या अमेरिकेत 2269 मृत्यूची नोंद झाली आहे, जी जगभरातील नवीन मृत्यूंपैकी एक तृतीयांश आहे.

सक्रिय प्रकरणांमध्ये अमेरिका अव्वल आहे. जगभरात 4.89 कोटी सक्रिय प्रकरणे आहेत. त्यापैकी 2.06 कोटी एकट्या अमेरिकेत आहेत. आतापर्यंत जगभरात 31.73 कोटींहून अधिक लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. त्यापैकी 26.28 कोटी बरे झाले आहेत. तर 55.29 लाखांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगातील कोरोना रुग्णांची आतापर्यंतची स्थिती
एकूण संक्रमितः 31.73 कोटी
बरे झालेले : 26.28 कोटी
सक्रिय प्रकरणे: 4.89 कोटी
एकूण मृत्यू: 55.29 लाख

ब्रिटनमध्ये कोरोनाची लाट ओसरतेय; 59% ची घट, युरोपमध्ये 29% ची वाढ

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्यात, ब्रिटनमध्ये नवीन प्रकरणांमध्ये सुमारे 59% घट झाली आहे. या वर्षी 4 जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 2.18 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तर 12 जानेवारीला 1.29 लाख नवीन रुग्ण आढळून आले. ब्रिटनच्या 315 पैकी 95 कौन्सिलमध्ये दररोज रुग्णांची संख्या कमी होत आहे.

लंडनमध्ये 31 डिसेंबर 2021 पासून, 11 जानेवारीपर्यंत प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. ब्रिटीश शास्त्रज्ञांचा दावा आहे की, ब्रिटनचा हा कल दक्षिण आफ्रिकेसारखाच आहे, जिथे 12 डिसेंबर रोजी 37,875 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. 11 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत फक्त 5,668 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. दुसरीकडे, ब्रिटन वगळता उर्वरित युरोपमध्ये, कोरोना संसर्गाच्या दररोजच्या नवीन प्रकरणांमध्ये सुमारे 29% ची वाढ नोंदवली जात आहे.

अमेरिकेत 50 लाख मुलांची मोफत कोविड चाचणी होणार आहे

अमेरिकेत बायडन प्रशासन शाळा सुरू ठेवण्याचा आग्रह धरत आहे. बुधवारी उशिरा प्रसिद्ध झालेल्या न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन सरकार एक नवीन पाऊल उचलणार आहे, जेणेकरून शिक्षण क्षेत्राला महामारीपासून वाचवता येईल. त्यासाठी शाळांमध्ये लाखो चाचण्या मोफत घेण्याची तयारी सुरू आहे. सुमारे 50 लाख रॅपिड अँटीजन चाचण्या केल्या जातील. यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे.