आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus WHO | World Health Organization (WHO) Issued Warning About Increasing Coronavirus Disease (COVID 19) Cases Of Among Youth

WHO चा तरुणांना इशारा:5 महीन्यात संक्रमण 3 पट वाढले, 15 ते 24 वयोगटातील तरुणांमधील संक्रमणाचा धोका 4.5 वरुन 15 टक्के झाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतीक आरोग्य संघटना (WHO) ने तरुणांमधील वाढत्या कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त केली आहे. WHO नुसार, जगभरातील तरुणांमध्ये कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. मागील 5 महीन्यात 15 ते 24 वयोगटातील तरुणांमधील संक्रमण तीन पट वाढले आहे.

24 फेब्रुवारीपासून 12 जुलैदरम्यान संक्रमणाचा दर 4.5 वरुन 15 झाला आहे. तर, 5 ते 14 वयोगटातील मुलांमधील संक्रमण 0.8 टक्क्यावरुन 4.6 टक्के झाले आहे. संशोधकांनुसार, अनेक ठिकाणी शाळा परत सुरू झाल्यामुळे ही प्रकरणे वाढले आहेत.

जागतीक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधानोम यांनी सांगितले की, 'आम्ही यापूर्वीही म्हणालो होतो आणि आताही म्हणत आहोत की, तरुण पिढी सुरक्षित नाही. तरुणांना संक्रमण होऊ शकतं, यांचा मृत्यूही होऊ शकतो.'

WHO नुसार, तरुणांमधील वाढत्या संक्रमणाचे कारण नाइटक्लब पार्टी आणि बाहेर फिरणे आहे. यामुळेच जगभरात रुग्णसंख्या वाढली आहे. मागील पाच महिन्यात 60 लाख तरुणांना लागण झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेसह, यूरोपीयन आणि एशिया देशांमध्ये रुग्ण वाढले

WHO नुसार, तरुणांमधील कोरोनाची नवीन प्रकरणे फक्त अमेरिकन देशातच नाही, तर यूरोपीय (स्पेन, जर्मनी, फ्रांस) आणि आशियामधील देशांमध्येही वाढले आहेत.