आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Coronavirus World; Coronavirus Outbreak In All Contries;Live Today News Updates World Cases Novel Corona COVID 19

जगात कोरोना:आतापर्यंत 34.83 लाख लोकांना कोरोनाची लागण आणि 2.44 लाख मृत्यू; रशियात एका दिवसात तब्बल 10633 रुग्ण सापडले

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्कोमध्ये सफाईकर्मचाऱ्यांनी रस्त्यांना सॅनिटाइज केले - Divya Marathi
मॉस्कोमध्ये सफाईकर्मचाऱ्यांनी रस्त्यांना सॅनिटाइज केले
  • अमेरिकेत 24 तासात 28 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले, संक्रमितांची संख्या 11 लाखांवर

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत 34 लाख 79 हजार 520 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2 लाख 44 हजार 580 पेक्षा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 11 लाख 8 हजार 23 रुग्ण ठीक झाले आहेत. रशियात 24 तासात 10633 नवीन रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा 1 लाख 34 हजार 687 झाला आहे. रशियाने मास्क आणि पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) च्या निर्यातीवरील निर्बंद हटवले आहेत. मागच्या महिन्यात यावर प्रतिबंध लावण्यात आले होते.

चीन: दोन नवीन रुग्णांची नोंद

चीनमध्ये 24 तासात 2 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नॅशनल हेल्थ कमीशननुसार देशात आतापर्यंत 82 हजार 877 संक्रमित आहेत, तर 4633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दलाई लामा यांची नागरिकांना एकत्र येण्याची अपील

तिब्बती धर्मगुरु दलाई लामा यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची अपील केली आहे. ते म्हणाले की, अशा संकटसमयी आपण आपले आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत चिंतीत आहोत. आता आपल्या सर्वांनाच एकत्र येऊन या महामारीशी लढायचे आहे.

अमेरिका: 11 लाखांपेक्षा जास्त संक्रमित

अमेरिकेच एका दिवसात 28 हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. यासोबतच देशातील एकूण संक्रमितांची संख्या 11 लाख 59 हजार 430 झाली आहे. देशातील अलबामा आणि आइडाहोसह अनेक भागातील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...