आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Coronavirus World | Outbreak China Italy Iran USA Japan France Live 21 May News Updates World Cases Novel Corona COVID 19 Death Toll

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कोरोना:जगात 50 लाखांवर कोरोनाचे रुग्ण, 30 दिवसांत वाढले 25 लाख रुग्ण; दीड महिन्यापासून रोज 75 ते 95 हजार रुग्ण आढळताहेत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जगात भारतासह ८ देशच असे, जेथे रोज १०० पेक्षा जास्त रुग्ण दगावताहेत
  • सुरुवातीचे २५ लाख रुग्ण १४२ दिवसांत आढळले होते

जगात कोरोना रुग्णांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. केवळ ३० दिवसांतच २५ लाख रुग्णांची वाढ झाली आहे. सुरुवातीला रुग्णसंख्या २५ लाख होण्यास १४२ दिवस लागले होते. मंगळवारी जगात एकूण ९४ हजार नवे रुग्ण आढळले. ही संख्या ५ एप्रिलनंतर स्थिर आहे. मात्र दोन-तीन दिवसांत यात घट होऊन ती ७५ हजारांपर्यंत येते व नंतरच्या तीन दिवसांत पुन्हा ९५ हजारांज‌वळ जाते. दीड महिन्यापासून नव्या रुग्णांची सरासरी स्थिर आहे. नवे रुग्ण ना घटताहेत ना वाढताहेत. दोन दिवसांपासून अमेरिका, ब्राझील येथे ३० हजारांहून जास्त रुग्ण आढळताहेत.

नवे रुग्ण : एका लाखाहून जास्त रुग्णांच्या ११ देशांत फक्त ब्राझील-भारत, जेथे नवे रुग्ण वाढताहेत; ९ देशांत घटताहेत

> ब्राझील आणि भारतात नव्या रुग्णांची संख्या वाढते आहे, तर ११ सर्वाधिक रुग्णांच्या देशांपैकी अमेरिका, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स, तुर्की आणि इराणमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. > ब्राझीलमध्ये १० दिवसांपूर्वी सर्वाधिक ६ हजार रुग्ण आढळले,आता १६ हजारांहून जास्त आढळताहेत. भारतात मागील आठवड्यात २ वेळा ४ हजारावर रुग्ण आढळले होते. आता ५ हजारांहून जास्त आढळताहेत.

> ४०.५३ लाख रुग्ण अमेरिका आणि युरोपात आहेत. आशियात ८.४१ लाख रुग्ण आहेत.

> सर्वात चांगली स्थिती आफ्रिकेत आहे. तेथे ९३,२६१ रुग्ण आहेत. १७ हजार द. आफ्रिकेत आहेत.

सक्रिय रुग्ण : अमेरिका, रशिया, इंग्लंड, ब्राझील, भारत या ५ देशांतच वाढताहेत

> एक लाखाहून जास्त रुग्णांच्या ११ देशांपैकी अमेरिका, रशिया, इंग्लंड, ब्राझील आणि भारतात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, भारतात सक्रिय रुग्णवाढीचे प्रमाण फक्त ३.६% आहे. त्यानुसार, भारतात १९ दिवसांत सक्रिय रुग्ण दुप्पट होत आहेत.

> ब्राझीलमध्ये हे प्रमाण ११ % पर्यंत पोहोचले आहे. अमेरिका, रशिया आणि इंग्लंडमध्ये सक्रिय रुग्णवाढीचे प्रमाण ८% हून कमी आहे.

अमेरिका: 11,47,255

इंग्लंड: 2,13,617

रशिया: 2,20,974

स्पेन: 2,04,259

ब्राझील: 1,47,108

फ्रान्स: 90,230

इटली: 65,129

भारत: 61,052

तुर्की: 34,521

इराण: 20,311

मृत्यू : जगात भारतासह ८ देशच असे, जेथे रोज १०० पेक्षा जास्त रुग्ण दगावताहेत

> ब्राझील आणि भारतातच रोज मृतांची संख्या वाढत आहे, तर अमेरिका, इंग्लंड, इटली, पेरू, मेक्सिकोत मृत्यू घटताहेत. रशियात रोजच्या मृतांची संख्या १४ वर स्थिर आहे.

> ब्राझीलमध्ये मृत्यूवाढीचा वेग सर्वाधिक आहे. तेथे आठवड्यापूर्वीपर्यंत रोज ४०० मृत्यू होत होते. आता ११०० होत आहेत. अमेरिकेत पूर्वी २००० हून जास्त मृत्यू व्हायचे, आता १५०० हून कमी होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...