आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Correct The Mistake By Saying 'I'm Sorry' If The Child Is Scolded, Tell Them You're Upset Too: Expert

दिव्य मराठी विशेष:मुलांना खडसावले तर ‘आय ॲम सॉरी’ म्हणत लगेच चूक सुधारा, यामुळे तुम्हीही नाराज आहात हे त्यांना सांगा : तज्ज्ञ

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीमुळे वाढत्या मानसिक-आर्थिक तणावाने पालकांचा संयम कमी होत आहे

आय ॲम सॉरी... म्हणायला तीन शब्द, मात्र ते खूप परिणाम करू शकतात. विशेषत: मुलांवर. अशीच घटना मागील आठवड्यात अमेरिकेत घडली. एक आई घरूनच काम करत असताना मुलीने तिच्या कामात अनेकदा व्यत्यय आणला. तिला शाळेतील एका कार्यक्रमाची एक जबाबदारी देण्यात आली होती. कधी लाल रंगाची स्लिपर, तर कधी कंगवा घेऊन ती चौथ्यांदा खोलीत आली असता आईने तिला रागावून बाहेर जाण्यास सांगितले. मुलीला वाईट वाटले. आई कधीच एवढ्या कडक शब्दांत बोलली नव्हती. तज्ज्ञांचे मत आहे की, सर्वच पालक असे करतात. मात्र, जेव्हा असे होईल तेव्हा मुलांची माफी मागा. तसेच तुम्ही या तीन बिंदूंवरही अंमलबजावणी करू शकता.

चूक मान्य करा : न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात वैद्यकीय मानसशास्त्राच्या प्राध्यापक जेनी हडसन सांगतात की, असे घडल्यास तुम्ही शांत झाल्यावर मुलांची माफी मागा व आपल्या भावना समजावून सांगा. राग आल्याबद्दल तुम्हालाही वाईट वाटत असल्याचे सांगा. निराशेमुळे असे घडल्याचे सांगा. सोबत फिरायला जाऊ शकता. दीर्घ श्वास घ्या, चर्चा करणे टाळा.

स्वत:ला वेळ द्या : या स्थितीत काय करायचे हे कळत नसेल तर स्वत:ला वेळ द्या. मानसशास्त्रज्ञ अॅलेक्झेंड्रा साक्स म्हणतात, मुलांना एकटे राहू देता येत नाही. मित्राशी बोलून मन मोकळे करा.

मुलांच्या पातळीवर विचार करा : डॉ. साक्स यांच्या मते, मुलांना भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, ती लगेच व्यक्त हाेतात. त्यांच्या पातळीवर जाऊन विचार करा. आपल्यापैकी अनेक जण यातून गेलेलो आहोत. महामारीमुळे आर्थिक, मानसिक तणाव एवढा वाढला आहे की पालक संयम गमावतात. यातून चर्चेतूनच मार्ग निघेल.

वारंवार चेष्टा करू नका, मुलांमध्ये नकारात्मकता येऊ शकते : मानसशास्त्रज्ञ
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूलमधील मानसशास्त्रज्ञाच्या तज्ज्ञ डॉ. पूजा लक्ष्मिन यांचे म्हणणे आहे की, मुलांना रागावणे सामान्य आहे. मात्र, त्यांच्यासोबत शारीरिक वा भावनात्मक पातळीवर चुकीचे वागू नका. त्यांची वारंवार चेष्टा करू नये, प्रेमात कमतरता नको, यामुळे त्यांच्यात नकारात्मकता येऊ शकते. मुलांना तुमच्या देखरेखीची जास्त गरज आहे याचा संकेत तुम्ही नेहमी असे वागल्यास यातून दिसेल. डॉक्टरांचीही मदत घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...