आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:प्रत्येक मत मोजा, मतमोजणी रोखण्याच्या ट्रम्प यांच्या अडेलतट्टूपणाला प्रत्येक शहरातून प्रत्युत्तर

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जय असो की पराजय, ट्रम्प यांचा राजकारणात दबदबा राहणार

अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही असली तरी या निवडणुकीत ज्या त्रुटी समोर आल्या आहेत, त्यामुळे लोकांचा संताप वाढला आहे. सध्या मतमोजणीत गोंधळाचा प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत. मतदानादरम्यान विरोधकांच्या, समर्थकांच्या मतदारांनाही लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे. त्यावर एक दृष्टी...

मतदान केंद्र हटवणे : जेथे विरोधी पक्षाला जास्त मतदान होते तेथे राज्य सरकारच्या वतीने कमी पोलिंग बूथ उभारले जातात. विस्काॅन्सिनमध्ये कृष्णवर्णीय भागात २१ हजार पोलिंग बूथ काढण्यात आले.

बनावट ड्रॉप बॉक्स : डेमोक्रॅटचा बालेकिल्ला कॅलिफोर्नियात रिपब्लिकन पक्षावर खोटे बॅलेट ड्रॉप बॉक्स ठेवल्याचे आरोप झाले. विरोधी पक्षाचे मतदान वाया जावे म्हणून मतदारांना चुकीची मतपत्रिका पाठवल्या.कृष्णवर्णीयांना जास्त प्रतीक्षा : कृष्णवर्णीय मतदारांना मतदान रांगेत श्वेत मतदारांच्या तुलनेत जवळपास दुप्पट प्रतीक्षा करावी लागली, अशा तक्रारी आल्या.

मतदानाच्या दिवशी सुटी नाही : अमेरिकेतील अनेक राज्यांत मतदानाच्या दिवशी सुटी नसते. तेथे बहुतांश खासगी नोकरीत तासाच्या हिशेबाने पैसे मिळतात. यामुळे अनेक गरीब मतदार मतदान करायला येत नाहीत.

कमी मतदान केंद्रे : अनेक राज्यांनी एका जिल्ह्यात एक बूथचा नियम लागू केला आहे. यामुळे गावात राहणाऱ्यांना खूप त्रास झाला. काही ठिकाणी तर लाेकांना मतदानासाठी १००-१५० किमी लांब जावे लागते. एकूणच अडथळे आणण्याचे काम पक्ष करतात.

जय असो की पराजय, ट्रम्प यांचा राजकारणात दबदबा राहणार
डोनाल्ड ट्रम्प मतमोजणीत प्रतिस्पर्धी बायडेनहून पिछाडीवर पडले आहेत. ते पराभूत झाले तर राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्तीचा निवडणुकीत पराजय होण्याची ही २८ वर्षांतील पहिलीच वेळ असेल. ट्रम्प जिंकले काय किंवा हरले काय, अमेरिकेतील राजकारणात त्यांचा दबदबा राहील, असे जाणकारांना वाटते. विद्यमान अध्यक्ष असल्याने ट्रम्प यांच्याकडे आणखी ७४ दिवसांचा कार्यकाळ हाती आहे. यादरम्यान ते अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन आपला संताप व खुन्नस दाखवून देऊ शकतात. एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर ए व्रे व सरकारच्या संक्रामक रोगाचे तज्ज्ञ डॉ. अँथनी ए फाउकी त्यांच्या निशाण्यावर असू शकतात.

तीन राज्यांत तिसऱ्या पक्षाला जास्त मते
अमेरिकेतील निवडणुकीत यंदा लिबर्टेरियन पार्टीचे उमेदवार जो जोर्गेसन यांना १.१४ टक्के (सुमारे १६ लाख) मते पडली. हा टक्का त्यांच्या समर्थकांनादेखील चकित करणारा आहे. मिशिगन, विन्स्कॉन्सिन, नेवाडा येथील चुरशीच्या लढतीत बायडेन व ट्रम्प यांना मिळालेल्या मतांच्या फरकाहून जास्त मते संपादन केली. मिशिगन, विस्कॉन्सिनमध्ये बायडेन विजयी झाले. नेवाडामध्येही आघाडीवर आहेत. त्यांनी यापैकी एक राज्यही गमावले तर निकालाचे चित्र बदलू शकते. लिबर्टेरियन उमेदवारास मिळालेली मते बायडेन यांच्यासाठी पूरक ठरली आहेत, असे म्हणता येईल. डेमोक्रॅट व रिपब्लिकन या दोन्ही पक्षांना पसंत करत नसणारे मतदार लिबर्टेरियन पक्षाला कौल देतात.