आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टरला तुरुंगवास:रेप केसमध्ये कोर्टाने सुनावली 4 वर्षांची शिक्षा, टिंडरवर झाली होती पीडितेशी भेट

लंडन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील एडिनबरा येथील भारतीय वंशाच्या डॉक्टरला एका महिलेवरील बलात्कार प्रकरणात 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्कॉटिश न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चमूने दिलेल्या निकालानुसार 3 वर्षांपूर्वी घडलेल्या या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत डॉक्टर मनेश गिल (39 वर्ष) यांना दोषी ठरवत हा निकाल दिला आहे.

एडिनबराच्या न्यायालयाने मागील महिन्यात या प्रकरणाची सुनावणी घेतली होती. यात समोर आले आहे की, मनेश गिलने डिसेंबर 2018 मध्ये ऑनलाईन टिंडर अ‍ॅपवर माईक या नावाने प्रोफाइल बनवून सदर महिलेला हॉटेल स्टरलिंगमध्ये भेटायला बोलावले होते. प्रकरण ऐकल्यानंतर न्यायालयाने मनेश गिलला अपराधी ठरवले होते.पीडिता ही नर्सिंगची विद्यार्थिनी होती.

आरोपी डॉक्टर तीन मुलांचा पिता

याप्रकरणी न्यायालयीन सुनावणी दरम्यान महिलेने सांगितले, लैंगिक अत्याचारादरम्यान त्यांचे त्यांच्या शरीरावर नियंत्रण राहिले नव्हते. तीन मुलांचे वडील असलेल्या गिलने दावा केला की दोघांमध्ये सहमतीने संबंध बनले होते, मात्र न्यायालयानुसार पीडिता संबंध बनवण्यासाठी हो अथवा नाही म्हणण्याच्या परिस्थितीत नव्हती, अशात मनेशने संबंध बनवून लैंगिक गुन्हा केला आहे. याशिवाय मनेशचे नाव लैंगिक गुन्हेगारांच्या नोंदणीतही करण्यात आले आहे.

स्कॉटिश पोलिस म्हणाले- वाईट व्यवहाराचे परिणाम भोगावे लागतील

स्कॉटलँड पोलिसांच्या सार्वजनिक संरक्षण युनिटचे जासूसी पोलीस फोर्ब्स विल्सनने सांगितले कि, गिल याला शिक्षा सुनावल्याने हा संदेश दिला जात आहे की, जर कोणीही व्यक्ती लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हेगार ठरले तर त्याला शिक्षेस सामोरे जावेच लागेल. विल्सन ने पुढे सांगितले, आपल्या वाईट वागणुकीचा परिणाम भोगावाच लागेल. पीडितेने समोर येत आपली आपबिती सांगून बहादुरी दाखवली आहे आणि या संपूर्ण तपासादरम्यान त्यांनी केलेल्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला आशा आहे की, आजच्या या निर्णयाने त्यांना दिलासा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...