आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोव्हॅक्सिन सर्वात प्रभावी:स्टडीमध्ये दावा- डबल म्युटंटसोबतच ब्रिटनच्या स्ट्रेनलाही नष्ट करते कोव्हॅक्सिन, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीसने रविवारी कोरोनाची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन संदर्भात एक चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या अभ्यासात असा दावा केला गेला आहे की, कोव्हॅक्सिन भारतात आढळून आलेल्या डबल म्युटंट कोरोना व्हॅरिएंटविरुद्ध बऱ्याच प्रमाणात संरक्षण प्रदान करते. हे व्हॅक्सिन ब्रिटनमध्ये आढळणार्‍या व्हेरिएंट्ससह इतर अनेक व्हेरिएंटवर प्रभावी आहे.

यापूर्वी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देखील जवळजवळ सर्व प्रमुख व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी असल्याचे सांगितले होते.

क्लिनिकल ट्रायलमध्ये कोव्हॅक्सिन 78% पर्यंत प्रभावी
कोरोना व्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक आणि ICMR ने कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम क्लीनिकल ट्रायल रिपोर्टमध्ये म्हटले होते की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल 78% आणि कोरोनाने गंभीरित्या प्रभावित झालेल्या रुग्णांवर 100% पर्यंत प्रभावी आहे. कंपनीने आपल्या एनालिसिसमध्ये कोरोनाचे 87 लक्षणांवर रिसर्च केला होता.

बातम्या आणखी आहेत...