आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाग्रस्त व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता टेस्टिंग किट किंवा प्रयोगशाळा नाही तर श्वानांना तयार केले जात आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञ कुत्र्यांना विशेष प्रशिक्षण देत आहेत. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना आहे की नाही हे श्वान केवळ गंध घेऊन सांगू शकेल. पेन्सिलव्हेनिया युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ वेटरीनेरी मेडिसिन विभागात हे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आणि कोरोना निगेटिव्ह व्यक्तींच्या स्वॅब आणि लघवीच्या नमुन्यांमध्ये फरक श्वानांना शिकवला जात आहे.
लक्षणे नसलेल्यांमध्येही कोरोना शोधण्यात होईल मदत
अमेरिकन संशोधकांच्या मते, गंध घेण्याची क्षमता स्मेल रिसेप्टर्सवर विसंबून असते. माणसात 60 लाख स्मेल रिसेप्टर्स असतात तर श्वानांमध्ये तब्बल 30 कोटी स्मेल रिसेप्टर्स असतात. अनेक कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणे सुद्धा दिसत नाहीत आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. अशात श्वानांची मदत खूप फायद्याची ठरू शकते. कोरोना व्हायरस अर्थात कोव्हिड-19 रोगाविरुद्ध लढताना जगभरात प्रत्येक देश आपली चाचणी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशात टेस्टिंग किटसह माणसाच्या सच्च्या मित्राचा हातभार लाभल्यास निश्चितच या लढ्यात चालना मिळेल.
प्रयोग कसे करणार काम?
अमेरिकन संशोधक सिंथिया ओटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवंत माणसांच्या नुमुण्याची श्वानांमार्फत चाचणी जुलै पर्यंत घेता येणे शक्य होईल. श्वान हे केवळ कोरोनाच नव्हे, तर कर्करोग, संसर्ग, नाकातील ट्युमर हे देखील ओळखू शकतात. यावर समजावून सांगताना सिंथिया म्हणाल्या, की कर्करोग, संसर्गजन्य रोग, नाकातील ट्युमर आणि गर्भाशयातील कर्करोग यामध्ये व्होलेटाइल ऑर्गेनिक कम्पाउंड असतो. त्याला व्हीओसी असे म्हणतात. हाच व्हीओसी ओळखण्यात श्वान तरबेज असतात. ते माणसातील रोग केवळ गंध घेऊन ओळखू शकतात. हा व्हीओसी माणसाच्या रक्तात, कफमध्ये आणि लघवीत असू शकतो.
असे होणार संशोधन
संशोधक सुरुवातीला केवळ 8 श्वानांना घेऊन हे संशोधन करणार आहेत. तीन आठवडे चालणाऱ्या या प्रयोगात श्वानांना कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही माणसांच्या स्वॅबचे नमुणे गंध करायला लावले जाईल. हे प्रयोग प्रयोगशाळेत पूर्वनियोजित आणि साचेबद्ध पद्धतीने केले जातील. एकदा या श्वानांनी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांच्या सॅम्पलमध्ये फरक ओळखला की ते यासाठी तयार होतील. सॅम्पल पॉझिटिव्ह येताच श्वान संकेत देतील. यानंतर पॉझिटिव्ह सापडलेल्या संबंधिक व्यक्तींवर पुढील चाचण्या आणि उपचार केले जाऊ शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.