आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावरील औषधाला मंजुरी:कोरोनावरील औषध मोलनुपिरावीरला मंजुरी देणारा पहिला देश बनला ब्रिटन, कोरोना उपचारात काय आणि कसा होणार फायदा?

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावर उपचार करणे आता सोपे होणार आहे. ब्रिटन सरकारने कोविड-19 वर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टॅबलेटला उपचाराकरिता सशर्त मंजुरी दिली आहे. मोल्नुपिरावीर असे या गोळीचे नाव आहे. हे औषध मूळची जर्मन औषध निर्माता कंपनी मर्क फार्माचे आहे. कोरोनावरील एखाद्या औषधाला मंजुरी देणारा ब्रिटन जगातील पहिलाच देश ठरला आहे.

इतर कंपन्यांनाही देणार प्रॉडक्शनची परवानगी
जर्मन कंपनी मर्क फार्माने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की ते हे औषध निर्मितीमध्ये स्वतःची मक्तेदारी ठेवणार नाहीत. उलट इतर औषध कंपन्यांना देखील हे टॅबलेट बनवण्यास मंजुरी देतील. गरीब देशांमध्ये अद्याप कोरोना व्हॅक्सीन पोहोचलेले नाहीत. कंपनीच्या निर्णयामुळे त्या देशांमध्ये सुद्धा ही औषध निर्मिती करता येईल. जेणेकरून गरीब देशांत कोरोनाचे उपचार सोपे होईल.

चाचण्यात यशस्वी
मर्कने आपल्या गोळ्यांच्या चाचण्या केवळ जर्मनीत नव्हे तर इतर देशांत सुद्धा घेतल्या आहेत. त्या चाचण्यांमध्ये मर्कचे मोल्नुपिरावीर औषध कोविड-19 वर परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्याच चाचण्यांच्या आधारे ब्रिटिश सरकारने या गोळ्यांना औपचारिक आणि सशर्त मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे औषध सामान्यांपर्यंत कधी व कसे पोहोचणार यावर अजुन चित्र स्पष्ट नाही.

काय फायदा होणार?
आतापर्यंतचे कोरोनावरील उपचार लक्षणे कमी करण्यावरच आधारित आहेत. जगात कुठेही कोरोनावरील नेमके औषध उपलब्ध नव्हते. पण, मोल्नुपिरावीर कोविड-19 ची लक्षणे जलद गतीने कमी करत असते. यातून कोरोना रुग्ण लवकर बरे होतात. त्यामुळे, कोरोनाच्या उपचारात हे एक ऐतिहासिक औषध मानले जात आहे. यातून कोरोनावर लवकर उपचार करून लवकरच रुग्णालयातून रुग्णांना डिस्चार्ज देता येईल.

मर्क फार्माने सांगितल्याप्रमाणे, या औषधीमुळे कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमीच राहील. सोबतच, जे रुग्णालयात आहेत त्यांच्यावर उपचार करून लवकर घरी पाठवता येईल. लक्षणांवर लवकर उपचार झाल्यास कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मृत्यूदर कमी होण्यात मदत होईल. सध्या या टॅबलेटच्या अमेरिका आणि युरोपियन देशांत चाचण्या सुरू आहेत. ब्रिटननंतर त्या ठिकाणी सुद्धा यास मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...