आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Covid 19 News ; World Now Have 1 Crore Cases, Transition Began In China; But America, Brazil, Russia And India Are The Most Infected

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात 1 कोटी कोरोना रुग्ण:संक्रमणाची सुरूवात चीनपासून झाली, मात्र आता अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटेनमध्ये सर्वाधिक रुग्ण 

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतीक आरोग्य संघटनेला पहिल्यांदा कोरोना रुग्णांची माहिती 31 डिसेंबरला मिळाली होती, याच्या तीन महिन्यानंतर 200 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला कोरोना
  • जगभरातील सर्वात जास्त 25 लाख 52 हजार कोरोना रुग्ण अमेरिकेतील आहेत, येथील मृतांची संख्या 1 लाख 27 हजार आहे

जगभरात कोरोना व्हायरसचे एक कोटी रुग्ण समोर आले आहेत. 180 दिवसांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली आहे. 31 डिसेंबर रोजी चीनमध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती. तेव्हा चीनमध्ये 54 प्रकरणे नोंदली गेली. तीन महिन्यांनतर, 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केला. 

या महामारीची सुरुवात अर्थातच चीनमध्ये झाली. परंतु आज अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटन हे जगातील पाच सर्वाधिक संक्रमित देश आहेत. या देशांमध्ये, 53% म्हणजेच 53 लाख 28 हजार 449 प्रकरणे आहेत. चीनमध्ये दररोज मिळणारे कोरोना प्रकरणं 6 मार्चनंतर 100 ने कमी झाले. तीन महिन्यांतच चीनने साथीच्या रोगावर जवळजवळ नियंत्रण मिळवले. आतापर्यंत येथे 83 हजारांहून जास्त प्रकरणे आढळून आली आहेत, तर केवळ 4634 लोकांचा जीव गेला आहे.

कोरोनाचे 75 लाख प्रकरण 67 दिवसांत नोंदवले गेले, सुरुवातीचे 25 लाख प्रकरणं 111 दिवसात 

जर आपण संसर्गाची गती पाहिली तर पहिले 25 लाख रुग्ण वाढण्यास 111 दिवस लागले. त्यानंतर अवघ्या 67 दिवसात 75 लाख प्रकरणे नोंदली गेली. म्हणजेच, एका दिवसात एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. जगभरात संक्रमणाचे आकडे एवढे मोठे आहे की, अनेक देशांची लोकसंख्याही यापेक्षा कमी आहे. जगभरातील 144 देशांची लोकसंख्या ही एक कोटींपेक्षा कमी आहे. यामध्ये इजराइल, यूएई, ऑस्ट्रिया, बेलारुस सारख्या देशांचा समावेश आहे.

जगभरात 53 लाखांपेक्षा जास्त रुग्ण झाले बरे  

जगभरात 53 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक म्हणजे रिकव्हरी रेट 54.08 टक्के आहे. म्हणजेच प्रत्येक 100 पैकी 54 रुग्ण बरे होत आहेत. जगातील 5 सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये रशियाचा रिकिव्हरी रेट 61.88% म्हणजेच सर्वाधिक आहे. त्याखालोखाल भारताचा 58.08%, ब्राझीलचा 54.49% आणि अमेरिकेचा 41.86% आहे. ब्रिटेनमधील बरे झालेल्या रुग्णांचा आकडा मिळालेला नाही, यामुळे रिकव्हरी रेटविषयी माहिती मिळू शकलेली नाही.

जगभरात 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू, सर्वात जास्त मृत्यू दर ब्रिटेनचा 

दरम्यान जगभरातील मृतांची संख्या ही पाच लाखांपेक्षा जास्त झाली आहे. जगाचा मृत्यू दर 5.01 टक्के आहे. पाच सर्वात जास्त प्रभावित देशांमध्ये सर्वात जास्त मृत्यू दर हा ब्रिटेनचा 14.03%आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेचा 4.99%, ब्राझीलचा 4.38%, भारताचा 3.07% आहे. जगातील सर्वात कमी मृत्यू दर रशियामध्ये 1.42% आहे.

दररोज एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली

20 जून रोजी जगात 89 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली. 21 जून रोजी 1.30 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली. 22 जून रोजी जवळपास 1.40 लाख प्रकरणे समोर आली.  23 जून रोजी 1.60, 24 जून रोजी 1.70 लाख, 25 जूनला 1.80 लाख आणि 26 जूनला 1.90 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली.

  • 5 संक्रमित देशांची अवस्था
देश  पहिला रुग्णसंक्रमितमृत्यूकिती बरे झाले
अमेरिका20 जानेवारी25,77,0181,27,9291,071,393
ब्राझील26 फेब्रुवारी 12,84,21456,1976,97,526
रशिया30 जनवरी6,27,6468,9693,93,352
भारत30 जनवरी5,29,33116,1023,10,120
ब्रिटेन31 जनवरी3,10,25043,514उपलब्ध नाही
बातम्या आणखी आहेत...