आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्राझीलमध्ये कोरोना वाढत आहे. एकीकडे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानात जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, दोन कोटी लोक कोरोनामुळे निर्माण स्थितीमुळे भुकेचा सामना करत आहेत. स्थिती अशी आहे की, एकूण २१.१ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाहीये. ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
नेटवर्कचे अध्यक्ष रेनाटो मालूफ म्हणतात की, शहरांमध्ये तरी लोक रस्त्यावर येऊन जेवण मागू शकतात. मात्र, गावांमध्ये स्थिती खूपच खराब आहे. कारण, तेथे रस्त्यांवर अन्न द्यायलाही कोणी भेटणार नाही. या स्थितीला कोरोनामुळे वाढलेली बेकारी व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली बेसुमार वाढ कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. ब्राझील इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिक्सच्या नुसार गेल्या एक वर्षात देशात तांदळाचा भाव ७०%, तर स्वयंपाकाच्या गॅसचे २०% वाढले आहेत.
बांगलादेशनंतर पाकमध्येही लागू शकते लॉकडाऊन
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पाकिस्तानातही लॉकडाऊन लागू शकते. लाहोरमध्ये एक वा दोन आठवड्यांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय कमांड अँड आॅपरेशन सेंटरच्या बैठकीत सादर करण्यात आला. इम्रान यांच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
जर्मनीत युवकांत संसर्गात वाढ, यूके व्हेरियंट ९०% अाढळला
जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटनुसार तेथे चाचण्या कमी असल्याने रुग्ण वाढत आहेत. इन्स्टिट्यूटला ७० रुग्णालयांतील माहितीच्या आधारे दिसले की, जर्मनीत तरुणांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यात श्वास घेण्यात त्रास मुख्य लक्षण आहे. तेथे ९०% नवे रुग्ण यूके व्हेरियंटचे आढळले.
कामासाठी ब्राझीलहून यूएसला गेलेल्यांचे लसीकरण नाही
कामाच्या शोधात ब्राझीलमधून मोठ्या संख्येने लोक अमेरिकेला जातात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. तेथे त्यांना लस दिली जात नाहीये. कारण त्यांच्याकडे वाहन परवानासारखे स्थानिक ओळखपत्र नाही. यूएसच्या ५० पैकी १० राज्यांतच अशा लोकांना लस दिली जात आहे.
ब्रिटन : अनलॉकची प्रक्रिया सुरू; दुकाने, हेअर सलून उघडली
ब्रिटनमध्ये १२ एप्रिलपासून प्रस्तावित अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. अनावश्यक दुकाने व हेअर सलून उघडले आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांनी साेमवारी सांगितले की, आनंद साजरा करा, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग आणि दक्षता पाळा. जॉन्सन यांनी ४ जूनला ६ महिन्यांसाठी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याच वेळी ६ महिन्यांची पूर्ण योजना जाहीर करण्यात आली की, केव्हा, काय आणि कसे उघडेल. अनलॉकनंतर दुकाने आणि हेअर सलूनवर लोकांची चांगलीच गर्दी दिसली. वस्तूंसाठी लोक रांगेत दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.