आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेंटॅगॉन या अमेरिकी संरक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी एक मायक्रोचिप व तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते शरीरातील कोरोना विषाणूची लक्षणे ओळखेल, नंतर विषाणू फिल्टरद्वारे रक्तातून काढला जाईल. हे नवे तंत्रज्ञान डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीएआरपीए) विकसित केले. या चमूचे प्रमुख, डॉ. मॅट हॅपबर्न यांनी दावा केला की, कोविड-१९ अंतिम महामारी असेल. आता आम्ही भविष्यात कुठल्याही जैविक आणि रासायनिक हल्ल्यापासून बचावासाठी पूर्णपणे तयार आहोत.
डॉ. हेपबर्न म्हणाले की, मायक्रोचिप शरीराच्या कुठल्याही भागात त्वचेच्या खाली लावता येईल. ती शरीरातील प्रत्येक रासायनिक प्रतिक्रिया दाखवेल. तुम्ही किती वेळेत संक्रमित होणार हे चिप सांगेल. डॉ. हेपबर्न यांनी टिश्यूसारखा पदार्थ दाखवत सांगितले की, हा मायक्रोचिपमध्ये राहील आणि तो रक्ताची सतत तपासणी करून अहवाल देईल. तुम्ही कुठेही रक्त चाचणी करू शकाल. तपासणीनंतर रिझल्ट तत्काळ मिळत असल्याने वेळ न दवडता संसर्ग फैलावण्याच्या आधीच विषाणू जिथे आहे तिथे त्याला नष्ट करता येईल.
आम्ही यासाठी डायलिसिसप्रमाणे एक यंत्र विकसित केले आहे. ते रक्तातून विषाणूला पूर्णपणे काढून टाकते. डॉ. हेपबर्न म्हणाले, आम्ही ‘पेशंट-१६’ या लष्करी जवानावर त्याची चाचणी घेतली. ती यशस्वी ठरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.