• Home
  • International
  • Covid 19 WHO: World Health Organisation Chief On Coronavirus And Lockdown Latest News And Updates

लॉकडाउन घोषित केल्याने कोरोना व्हायरस थांबेल हा गैरसमज, जागतिक आरोग्य संघटनेचा लॉकडाउन घोषित करणाऱ्या देशांना इशारा

  • जागतिक आरोग्य संघटनेने जगाला सांगितले, लॉकडाउनमध्ये नेमके काय करावे...

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 01:30:00 PM IST

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्याचा उपाय म्हणून अनेक देशांनी आप-आपल्या नागरिकांना कथित लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. परंतु, केवळ लॉकडाउन करून कोरोनावर मात करता येणार नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी जगाला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरोस अधानोम गॅब्रिएसस यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना व्हायरस विरोधात अनेक देशांनी कथित लॉकडाउन घोषित केले आहेत. हे त्यांच्या मानाने उपाय असले तरीही यातून कोरोनावर मात करता येणार नाही. यानंतर लॉकडाउन जारी करणाऱ्या देशांनी नेमके काय करावे यावर गॅब्रिएसस यांनी मार्गदर्शन केले आहे.


डब्लूएचओचे गॅब्रिएसस यांच्या मते, "ज्या-ज्या देशांनी कोरोना व्हायरस विरोधात लॉकडाउनची घोषणा केली, त्या देशांना आमचे आवाहन आहे की त्यांनी या काळाचा उपयोग कोरोनावर हल्ला करण्यासाठी वापरावा. लॉकडाउन जारी करून आपण कोरोनाशी लढण्यासाठी केवळ अतिरिक्त वेळ मिळवला आहे. आता या वेळेचा चांगला उपयोग कसा करावा हे या देशांवर विसंबून आहे. डब्लूएचओ प्रमुख पुढे म्हणाले, ''आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांना शोधणे, त्यांच्या चाचण्या घेणे सध्या काळाची गरज आहे. यासोबतच, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठे निर्णय घेणे आवश्यक आहे.''

उल्लेखनीय बाब म्हणजे, 180 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना पोहोचले आहे. यातील भारतासह बहुतांश देशांनी लॉकडाउन घोषित केले आहे. या व्हायरसने आतापर्यंत 20 हजारपेक्षा अधिक लोकांचा जीव घेतला. त्यात चीन आणि इटली आघाडीवर आहेत. जगभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्वत्र कर्फ्यू आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेची लॉकडाउनवर ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

X