आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Covid Alarm If The Corona In The Room Is Blocked, The Device Will Know Within 15 Minutes, More Accurate Than PCR And Antigen Test; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कोविड अलार्म - रूममध्ये कोरोनाबाधित असेल तर 15 मिनिटांतच उपकरणाला कळेल, पीसीआर व अँटिजन टेस्टपेक्षाही जास्त अचूकता

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमधील वैज्ञानिकांचे महत्त्वपूर्ण संशोधन, भविष्यातील महामारीतही कामी येणार
  • लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही सहजपणे ओळखता येणार

केवळ १५ मिनिटांतच खोलीमधील कोरोना संसर्गाला शोधून काढणारे उपकरण तयार करण्यात ब्रिटनच्या वैज्ञानिकांना यश आले आहे. माेठ्या रूमसाठी त्याला ३० मिनिटे लागतील. कोरोनाबाधितांची माहिती देणारे हे उपकरण आगामी काळात विमानांच्या केबिन्स, क्लासरूम, केअर सेंटर्स, घरे व कार्यालयांत स्क्रीनिंगसाठी महत्त्वाचे ठरू शकते. त्याचे नाव कोविड अलार्म असे ठेवले आहे. हे उपकरण स्मोक अलार्मपेक्षा काहीसे मोठे आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) आणि डरहॅम विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष आशादायक आहेत. उपकरणाच्या अचूकतेची पातळी ९०-१०० टक्क्यांपर्यंत असल्याचे वैज्ञानिकांनी चाचण्यांत सिद्ध केले आहे. ते पीसीआर लॅब-आधारित कोविड-१९ ची चाचणी व अँटिजन टेस्टच्या तुलनेत खूप जास्त अचूकपणे बाधितांबाबत माहिती देते. डिटेक्टर कोराेनाबाधितांना सहज शोधू शकते. बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणे नसली तरीही हे उपकरण प्रभावीपणे काम करते. एकदा कळल्यानंतर रूममध्ये उपस्थित लोकांची वैयक्तिकपणे चाचणी करावी लागते. संशोधकांनुसार, त्याचे निष्कर्ष सध्या प्राथमिक टप्प्यात आहेत. अभ्यास पत्रिकेत ते प्रकाशित झाले असून त्याचा आढावा घेणे बाकी आहे.

सार्वजनिक ठिकाणी संसर्ग ओळखणे आणि कोरोनासह भविष्यातील महामारीसाठीही उपकरण फायद्याचे ठरेल. डरहॅम विद्यापीठात जैवविज्ञानाचे प्राध्यापक स्टीव्ह लिंडसे म्हणाले की, प्रत्येक आजाराचा एक वेगळा गंध असतो. आम्ही कोरोनापासून संशोधन सुरू केले. बाधित आणि सामान्य लोकांच्या वासात फरक करणे यामुळे सोपे झाले. अाजारांना शोधण्याची ही पद्धत अभिनव आहे. हे उपकरण सुमारे ५.१५ लाख रुपयांचे आहे. मात्र, प्राणघातक अाजार शोधून काढण्यासाठी ही रक्कम फार मोठी नाही.

हे उपकरण संसर्ग ओळखून अधिकृत व्यक्तीला मेसेजही पाठवते...
रोबोसायंटिफिकचे हे उपकरण त्वचा आणि श्वासातून निर्मित रसायनांना ओळखून रुग्णांचा शोध घेते. व्हायरसमुळे बाष्पशील कार्बनिक यौगिकांत (व्हीओसी) बदल होऊ लागताे. यामुळे शरीरात गंध निर्माण होतो. उपकरणातील सेन्सर तो गंध अचूकपणे टिपतात. डिव्हाइस अधिकृत व्यक्तीलाही ही माहिती मेसेजच्या माध्यमातून पाठवून देते.

बातम्या आणखी आहेत...