आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुहान लॅब निर्दोष:कोरोना व्हायरस एखाद्या प्राण्यांव्दारे वटवाघूळांमधून माणसांत पोहचला; वुहानच्या लॅबमधून फुटला नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओ म्हणाला - व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल अधिक अभ्यासाची गरज

कोरोना व्हायरस माणसांमध्ये कसा पोहचला? या विषयावर गेल्या एक वर्षापासून जागतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. सुरुवातीला हा व्हायरस चीनच्या वुहानमधून आला असल्याचे काही वृत्त माध्यमांनी प्रसारित केले होते. परंतु, या दाव्यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. डब्लूएचओच्या तज्ञाने एका अवहालात दावा केला आहे की, हा व्हायरस एका प्राण्यांव्दारे वटवाघूळांमधून माणसांमध्ये प्रसारित झाला असल्याचे सांगितले आहे. पुढे बोलताना त्यांनी कोरोना व्हायरस हा चीनच्या वुहानमधून आला असल्याच्या गोष्टीचे खंडनही केले आहे.

डब्ल्यूएचओ म्हणाला - व्हायरसच्या उत्पत्तीबद्दल अधिक अभ्यासाची गरज
जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम कोराना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी चीनमधील वुहान शहरात गेली होती. परंतु, त्या टीमने हा व्हायरस माणसात कसा पोहचला यावर ठोस उत्तर दिलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ग्रॅब्रेयस यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय तज्ञ एक पत्रकार परिषद बोलावून त्यामध्ये तपासात काय समोर आल्याचे स्पष्ट करतील. सोबतच कोराना महामारीची उत्पत्ती शोधण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात आतापर्यंत 27 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगातील सर्व देशांना लॉकडाऊन करणे भाग पडले असून भारतासह जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले.

डब्ल्यूएचओच्या तपासणीवर चीनने आक्षेप घेतले होते
जगात कोरोना महामारीचा शिरकाव वुहानमधून झाला असल्याचा आरोप चीनवर सातत्याने केला जायचा.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील तसा दावा केला होता. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम गेल्या वर्षी 14 जानेवारी रोजी तपासणी करण्यासाठी चीनमध्ये गेली होती. ज्यावर चीन सरकारने आक्षेप घेतल्यामुळे अवहाल येण्यास उशीर लागला होता.

बातम्या आणखी आहेत...