आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Cprona Outbreak In World | Goat, Fruit Samples In Chinese Testing Kit In Tanzania Also Positive, Inquiry Order

दिव्य मराठी विशेष:टांझानियामध्ये चायनीज टेस्टिंग किटमध्ये बकरी,फळांचे नमुनेही पॉझिटिव्ह, चौकशीचे आदेश

डोडोमा (टांझानिया)एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पूर्व आफ्रिकेतील देश कोरोनामुळे बेहाल, विरोधकांचा आकडे दडपण्याचा आरोप

कोरोना संसर्गामुळे आधीच त्रस्त असलेल्या पूर्व आफ्रिकेतील टांझानियामध्ये बकरी व एक विशिष्ट फळ पॉपॉ देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. फळ व जनावरांचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठवले होते. हे अहवाल आल्यानंतर राष्ट्रपती जॉन मागुफुली यांनी अहवाल फेटाळून टेस्ट किट योग्य नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.

पाठवण्यात आलेले नमुने बकरी तसेच फळाचे आहेत. याची माहिती प्रयाेगशाळेला देण्यात आली नव्हती. नमुन्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर ही माहिती उजेडात आली. टांझानिया रविवारपर्यंत संसर्गाचे ४८० रुग्ण समाेर आले तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्राध्यक्ष जाॅन मागुफुली म्हणाले, आपल्याकडे चीनहून काेराेना विषाणूची तपासणी किट आलेली आहे. त्यात गडबड आहे. पाॅपाॅ फळे, बकरीदेखील काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. हे कसे काय हाेऊ शकेल? असा प्रश्न करून राष्ट्रपती मागुफुली यांनी लष्कराला या किटच्या चाैकशीचे आदेश दिले आहेत. तपासणी करणाऱ्या लाेकांनी माणसाशिवाय इतर गाेष्टींचेही नमुने संकलित केले हाेते. काेराेना विषाणू संसर्ग प्रकरणात दबाव वाढवत असल्याचा आराेप विराेधी पक्षाने सत्ताधारी सरकारवर केला आहे.

देशात लाॅकडाऊन किंवा इतर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडूनच अशा प्रकारच्या गाेष्टी करून दबाव वाढवण्याचे प्रयत्न हाेत असल्याचा आराेप विराेधी पक्षाने केला आहे. टांझानियामध्ये अंत्यसंस्कार तसेच इतर सामुदायिक कार्यक्रमांवर बंदी लागू आहे. संसर्ग झालेल्यांचा खरा आकडा सरकार दडवत असल्याचाही आराेप विराेधी पक्षाने केला आहे.

राष्ट्रपतींनी मादागास्करहून मागवली हर्बल आैषधी

राष्ट्रपती मागुफुली म्हणाले, मादागास्कर येथून काेविड-१९ ची हर्बल आैषधी मागवली आहे. तेथील राष्ट्रपती स्वत: त्यास प्रमाेट करत आहेत. मादागास्करचे राष्ट्रपती अँड्रे राजाेलिना यांच्याशी या मुद्यावर चर्चा झाली अाहे. ही आैषधी आणण्यासाठी एक विमानही पाठवण्यात येणार आहे. अशा हर्बल आैषधीला ‘काेविड आॅर्गेनिक्स’ असे नाव देण्यात आले आहे. मालागासी इन्स्टिट्यूट फाॅर अप्लाइड रिसर्चने आर्ताेमिसियाच्या एका राेपट्याद्वारे तयार केले आहे. अातापर्यंत या आैषधीची प्रयाेगशाळेत चाचणी झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...