आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शांघाय:चीनमध्ये इंग्रजीची क्रेझ, केजीतील मुले सहा महिने ट्यूशन घेऊन देतात टेस्ट; 2 वर्षांत होणार 5 लाख कोटींचा बाजार

शांघाय4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगल्या शाळेत प्रवेशासाठी चढाओढ, मातृभाषा मँडरिनवर वरचढ ठरतेय इंग्रजी

चीन सरकार नेहमीच मँडरिन भाषेचा अवलंब करण्यासाठी दबाव टाकते, परंतु आता नागरिकांमध्ये इंग्रजी भाषेची क्रेझ जोमाने वाढत आहे. हे वेड एवढ्या टोकाला गेलेय की आपल्या पाल्यास चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची ट्यूशन लावून त्यांना भाषेची परीक्षा द्यावयास लावत आहेत, जेणेकरून भविष्यात चांगल्या संधी मिळतील.

ब्रिटिश संस्था केंब्रिज दोन वर्षांपासून चीनमध्ये इंग्रजीची केईटी टेस्ट घेते आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रावर पालकांची प्रचंड गर्दी असते. कोणत्याही परिस्थितीत मुलगा लँग्वेज टेस्ट पास होईल यासाठी पालक जंग जंग पछाडतात. कारण, आता संधी हुकल्यास नंतर मुलास पुन्हा कधी संधी मिळेल हे सांगता येत नाही. कारण, ही परीक्षा वर्षातून खूप कमी वेळा होते. त्यासाठी नोंदणी करणेही अवघड जाते. काही पालक तर काळ्याबाजारात ५०० युआन (६० हजार रुपये) पर्यंत खर्च करून परीक्षेसाठी सीट मिळवतात किंवा परीक्षेसाठी शेकडो किमी अंतरावर जाण्याचीही पालकांची तयारी असते. यंदा कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यात ही परीक्षा झाली नाही यामुळेही गर्दी वाढली आहे. चीनमध्ये इंग्रजी भाषेचे वाढते प्रस्थ पाहता समाजात तीव्र स्पर्धा वाढीस लागण्याचे संकेत मानले जात आहेत. कारण, ३ वर्षांच्या चिमुकल्याचा रेझ्युमे तयार करण्यासाठी पालक प्रचंड मेहनत घेतात. केईटी परीक्षा देण्यासाठी शेकडो तासांची तयारी करावी लागते. इंग्लिश भाषेचे प्रशिक्षण देणारी कंपनी न्यू चॅनल इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुपचे संचालक वू झिंग्याग्यू म्हणतात, ६ महिन्यांचे प्रशिक्षण व प्रतितास ७,६०० रुपये आकारले जातात. दर आ‌ठवड्यात २ ते ३ तास प्रशिक्षण असते. एकंदर, इंग्रजीच्या वाढत्या क्रेझमुळे स्पोकन इंग्लिश क्लासेसचा व्यवसायही जोरात आहे. सन २०२२ पर्यंत या व्यवसायाची उलाढाल ५.५५ लाख कोटी रुपये (७५ अब्ज डॉलर्स) पर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

शाळांमध्ये लॉटरी पद्धतीने प्रवेश, मात्र पालक हट्ट साेडेनात
गतवर्षी खासगी शाळांमध्ये लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यास चीन सरकारने सांगितले. मात्र पालकांवर त्याचा परिणाम झाला नाही. पालकांच्या दृष्टीने प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. शांघायमधील एक पालक कॅरोलिन झँग म्हणाल्या, अनेक पालक दुसऱ्याचे पाहूनच मुलांना टेस्ट देण्यास सांगतात.

बातम्या आणखी आहेत...