आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:गुन्हेगारी टोळ्यांची लोकांना मदत, सरकारचा विरोध

इगुआला (मेक्सिको)एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मेक्सिकोत रुग्णालये देखील घेताहेत मदत, लहान व्यावसायिकांना कर्ज

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मक्सिकोच्या ग्युरेरोच्या इगुआला भागात रहिवासींना सूचना फलक दिसू लागले आहेत. त्यावर एक संदेश आहे- ‘इगुआलाच्या नागरिकांनो, तुम्ही घरातच राहा. बाहेर कसलीही अराजकता आम्हाला नकोय. लॉकडाऊनचा सन्मान करा. कोणी बाहेर दिसल्यास त्यास गंभीर दुखापत पोहोचवली जाईल.’

हा संदेश स्थानिक अधिकारी किंवा सरकारकडून नव्हे तर एका अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीने दिला आहे. हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. मेक्सिकोतील अनेक राज्यांत अशा गुन्हेगारी टोळ्या संचारबंदी लागू करू लागल्या आहेत. या दरम्यान या टोळ्या लोकांना खाण्या-पिण्यासह इतर अत्यावश्यक वस्तूंचाही पुरवठा करण्यात मदत करत आहेत. दुसरीकडे मात्र अशा गुन्हेगारी टोळ्यांची मदत मुळीच घेऊ नका. अन्यथा भविष्यात त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा सरकारने जनतेला दिला आहे.

काही आठवड्यांपूर्वी इटली, ब्राझील व अल सेल्वाडोरमध्येही अशा प्रकारचे वृत्त आले होते. इटलीचे नॅपल्स व पलेर्मो येथेही काही गुन्हेगारी टोळ्या लोकांना खाण्याची तसेच अंमली पदार्थही देत होती. दक्षिण इटलीत तर लोकांना अशा टोळ्या २५ ते ३० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत आणि भेटवस्तूही देतात. कोरोनाच्या काळात मेक्सिकोतील गुरेरो, मिचोआकेन, तमुलीपास व गुआनाजुआटोसारख्या गरीब राज्यांत अशा संघटना खाद्य-पदार्थ पोहोचवू लागले आहेत. एक टोळी फूड बॉक्ससह हँड सॅनिटायझर देत आहे. या सील बाॅक्सवर गँगचे नावही लिहिलेले आहे. त्याशिवाय मेक्सिकोतील काही रुग्णालये वैद्यकीय साधनाचा तुटवडा भरून काढण्यासाठी अशा टोळ्यांची मदत घेत आहेत. मेक्सिको व्यतिरिक्त कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, जपानमध्येही संघटित गुन्हेगारी टोळ्या सामानाचा पुरवठा करू लागल्या आहेत.

लहान व्यापाऱ्यांना कमी व्याजाचे कर्ज देण्याचेही प्रलोभन इटलीप्रमाणेच मेक्सिकोतील या टोळ्या व्यापाऱ्यांना कमी व्याजावरील कर्ज सुविधाही उपलब्ध करून देत आहेत. सरकारने लोकांना टोळ्यांच्या मनसुब्याविषयी इशारा दिला आहे. या टोळ्या नियंत्रण वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. संकट संपल्यानंतर या टोळ्या या उपकाराच्या बदल्यात मनी लाँड्रिंग, पोलिसांचे संरक्षण इत्यादी गोष्टींची मागणी करतील. त्याशिवाय बेरोजगार तरुणांना देखील हिंसेच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील, असे सरकारने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...