आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Crisis Due To Abruptly Changed Rules Banning Permanent Residents, Including Australian Citizens, From Entering India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन व्हेरिएंट:ऑस्ट्रेलियाची नागरिकांसह कायम रहिवाशांना भारतात जाण्यास बंदी, अचानक बदललेल्या नियमामुळे संकट

मेलबर्न / अमित चौधरी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या नियमांची माहिती नसल्याने विमानतळावरून परतले लोक

कोरोनाच्या भारतीय व्हेरिएंटचा फटका ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आशिष कुमार यांना बसला आहे. आशिष, त्यांची पत्नी व दोन मुलींना शुक्रवारी विमानतळावरून परत पाठवण्यात आले. आजारी वडिलांसाठी आशिष यांना हैदराबादला यायचे होते. यासाठी त्यांनी नाेकरी तर सोडली आपले घर, गाडी, साहित्यही विकून टाकले. रात्री ९ वाजता ते चेक इनसाठी पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली. आशिष यांनी अडीच लाख रुपयात तिकिटे घेतली, मात्र नव्या नियमांमुळे ते रस्त्यावर आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी मार्चपासून त्यांचे नागरिक व कायमच्या रहिवाशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. मात्र अपवादात्मक सूट होती. दरम्यान, भारतात संसर्ग वाढल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने नियम बदलला. आशिषसारख्या शेकडो भारतीयांनी आधी परवानगी घेतली, मात्र नियम बदलल्याने ती वाया गेली.

कठीण अटी लादल्या
कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला मदत करण्यासाठी जाणारे किंवा ऑस्ट्रेलियाच्या देशहितासाठी भारतात जाणाऱ्यांनाच जाण्याची परवानगी दिली जाईल किंवा अशी व्यक्ती जिला ऑस्ट्रेलियात उपचार उपलब्ध होत नाहीत व उपचारासाठी भारतात जात आहे.

बातम्या आणखी आहेत...