आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यात एक गोष्ट सारखी आहे. मग ते राष्ट्रपती असो की पंतप्रधान, उद्योगपती असो की खेळाडू. या अतिशय यशस्वी व्यक्ती बालपणी कोणत्या ना कोणत्या संकटातून गेल्या किंवा बालपणी त्यांनी आपले पिता वा माता-पिता दोन्ही गमावले. रसेल सिल्वेस्टर आणि एलिस थॉमसन यांचे नवे पुस्तक ‘व्हॉट आय विश आय वुड नोन व्हेन आय वॉज यंग: द आर्ट अँड सायन्स ऑफ ग्रोइंग अप’मध्ये हा दावा करण्यात आला आहे. लेखकांच्या मते, त्यांनी हा पॅटर्न पाहिला तेव्हा वाटले की हा योगायोग असावा. अभ्यास केला तेव्हा ते असाधारण वाटले. दोन्ही लेखकांनी ब्रिटनमध्ये १७२१ नंतरच्या ५५ पंतप्रधानांचे जीवन धुंडाळले. त्यातील अर्ध्या जणांनी लहानपणीच आपले माता-पिता गमावले होते. माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर १० वर्षांचे होते तेव्हा वडिलांचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. पंतप्रधान राहिलेल्या थेरेसा यांनी बालपणीच माता-पिता गमावले.
अनेक व्यावसायिक-उद्योगपतींचे बालपणही वेदनादायी राहिले आहे. अॅपलचे बॉस स्टीव्ह जॉब्ज यांना दत्तक जाण्यासाठी सोडून देण्यात आले. अॅमेझॉनचे जेफ बेजोस िपत्याबाबत कधीच जाणू शकले नाहीत. इतर सेलिब्रिटींबाबतही अशाच काहीशा घडना घडल्या. अमेरिकन राष्ट्रपती राहिलेल्या ४५ पैकी १२ व्यक्तिमत्त्वांनी तरुणपणीच वडील गमावले होते. त्यात जॉर्ज वाशिंग्टन, थॉमस जेफरसन आणि हरबर्ट हूव्हर यांचा समावेश आहे. बिल क्लिंटन यांनी जन्माआधीच आपल्या वडिलांना गमावले. बराक ओबामा २ वर्षांचे असतानाच पित्यांनी त्यांचा त्याग केला. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा नेल्सन मंडेला अवघ्या १२ वर्षांचे होते. नेपोलियन बोनापार्टने आपले वडील गमावले ते १६ व्या वर्षी. मँचेस्टर सिटी आणि इंग्लंडचे फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंग सांगतात की, ‘मी दोन वर्षांचा होते तेव्हा वडिलांची हत्या झाली. घटनेने माझे आयुष्यच पालटून टाकले.’ टेनिसपटू अँडी मरे नऊ वर्षांचा असताना त्याच्या शाळेत नरसंहार झाला. तो सांगतो, ‘खेळाद्वारे भावनांशी दोन हात करतो.’
अडथळे रचनात्मकता व नवाचाराचे नवे वळण घेऊन येतात
इंग्लंडमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य स्टुअर्ट रोज सांगतात, ‘वेदनादायी सुरुवात प्रतिभावंत लोकांसाठी उत्प्रेरकाचे काम करते. त्यांना आत्मनिर्भर आणि महत्त्वाकांक्षी होण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा मिळते. आनंदी, स्थिर बालपण साधारणपणे सुखी, स्थिर करिअर व कौटुंबिक जीवनाकडे घेऊन जाते. दुसरीकडे अडचणी रचनात्मकता आणि नवाचाराचे वळण ठरू शकतात. त्या लोकांना खूप वर घेऊन जातात. जीवनात सुरुवातीचे आघात एखाद्या व्हॅक्सिनसारखे असतात. ते तुम्हाला भविष्यात वेदनेपासून लढण्यासाठी अँटीबॉडी प्रदान करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.