आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हवामान बदलाचे 100 काेटी मुलांवर संकट; मुलांवर वाईट परिणाम हाेण्याची भीती

न्यूयाॅर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सुमारे १०० काेटी मुलांवर हवामान बदल व प्रदूषणाच्या परिणामांचा धाेका आहे. या पिढीवर हवामान बदलाच्या अत्यंत भयंकर जाेखमीचे संकट आहे. अनेक देशांत मुले हवामान बदलाच्या परिणामांना ताेंड देत आहेत. भारत, नायजेरिया, फिलिपाइन्स आणि आफ्रिकेसह ३३ देशांतील मुले एकाच वेळी एक किंवा चार परिणामांचा सामना करत आहेत. या परिणामांत उष्णतेची लाट, पूर, चक्रीवादळ, आजार, दुष्काळ, हवेतील प्रदूषणाचा समावेश आहे. युनिसेफच्या अहवालात त्यावरून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही स्थिती भयंकर असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

हवामान बदल, प्रदूषणाचा परिणाम, गरिबी, मुलांना स्वच्छ पाण्याची उपलब्धता, आराेग्य व शिक्षण इत्यादींविषयी वास्तवदर्शी चित्र या अहवालातून समाेर आले आहे. या विषयाच्या अभ्यासकांपैकी असलेले निक रीस म्हणाले, मुलांना हवामान बदलाचा फटका काेठे व कसा बसताेय हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे चित्र अकल्पनीय आहे. ते बदलण्यासाठी समस्यांची साेडवणूक वेळीच हाेणे गरजेचे आहे.

हवामान बदलाचे परिणाम असामान्य हाेते. पुढच्या काळात ते आणखी भयंकर असू शकतील. जगातील अव्वल १० देश अत्याधिक उच्च जाेखमीच्या श्रेणीत समाविष्ट हाेतात. ते केवळ ०.५ टक्के जागतिक उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत ९२ काेटी मुले पाण्याची कमतरता, ८२ काेटी उष्णतेची लाट, ६० काेटी मुले मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांशी झुंज देत आहेत.

३० काेटी मुलांचे जास्त प्रदूषणाच्या भागात वास्तव्य
जगातील सुमारे ३० काेटी मुले प्रदूषण जास्त असलेल्या भागात वास्तव्याला आहेत. त्यावरून युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीएटा फाेर म्हणाले, या संकटाशी आपण आता सामना केला नाही तर आगामी पिढीला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...