आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटा संकट:नवीन टेक कंपन्यांमुळे फेसबुकवर वाढतेय संकट, आता युजर्सच्या पदरात निराशा, मार्क झुकेरबर्गसाठी पुढील वाटचाल कठीण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाच्या शेअरमध्ये अलीकडे प्रचंड घसरण हाेत त्याने २०१० च्या दशकातील आैद्याेगिक पतनाचे संकेत दिले आहेत. अमेरिकन स्टाॅक एक्स्चेंज एसअँडपी ५०० इंडेक्सचे तज्ज्ञ म्हणाले, गुंतवणूकदारांच्या स्वप्नांना वास्तवाला ताेंड द्यावे लागते, अशी वेळ बुल मार्केटमध्ये अनेक वेळा येत असते. २००६ माॅर्गेज डिफाॅल्ट दरांत वृद्धी, २०००-२००१ मध्ये डाॅटकाॅम कंपन्यांत बूम दिसले हाेते. त्यानंतर नव्य तंत्रज्ञानाच्या कंपन्यांचा काळ आला. मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकसाेबतही असाच काहीसा अनुभव राहिला. दाेन प्रकारच्या प्रतिस्पर्धींमुळे मेटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिनी अॅप टिकटाॅकचे त्याच्यासमाेर आव्हान आहे. टिकटाॅकचे दर महिन्याला १०० काेटी सक्रिय युजर्स आहेत. अनेक अडचणी असूनही हे अॅप तरुणांमध्ये लाेकप्रिय आहे. फेसबुकसाठी ही एक अडचण आहे. तंत्रज्ञानविषयक प्लॅटफाॅर्मदरम्यान असलेल्या तीव्र स्पर्धा ही दुसरी माेठी अडचण ठरली आहे. कारण ते नवीन सेवा उत्कृष्ट तंत्रज्ञानासह आणू पाहत आहेत. त्यातून ते जास्तीत जास्त ग्राहक वर्ग तयार करू लागले आहेत. फेसबुकचे तंत्रज्ञान आता युजरला जुन्या काळातील वाटू लागले आहे.

नव्या टेक कंपन्यांची वाढती गुंतवणूक
फेसबुकच्या बाबतीत अॅपलचे नवे गाेपनीय नियम हीच माेठी समस्या आहे. त्यानुसार युजरला जाहिरात-ट्रॅकिंगच्या पर्यायातून बाहेर पडता येते. तशी परवानगी देणारे हे नियम आहेत. फेसबुकचे नियम जाहिरातदारांसाठी अनुकूल नाहीत. बाजारात नव्या टेक कंपन्या माेठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवत आहेत. पाच माेठ्या फर्मची विक्रीची भागीदारी २०१५ पासून २० टक्क्यांनी वाढून ४० टक्के झाली आहे. त्यांची एकूण गुंतवणूक एका वर्षात २२.३९ लाख काेटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळेही फेसबुकला आव्हान मिळू लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...