आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुराेपमध्ये फ्रान्स, स्वित्झर्लंडसह अनेक देशांत हिवाळ्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. ८ देशांत तर जानेवारीमध्ये कमाल तापमानाचा विक्रम मोडला आहे. पोलंडच्या वारसॉमध्ये १८.९ अंश सेल्सियस, सोएंच्या बिलबाओमध्ये २५.१ अंश सेल्सियस तापमान नोंदले आहे. हे सरासरीपेक्षा १० अंश जास्त होते. एवढा फरक असामान्य आहे. आर्क्टिक सर्कलनजीक डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड आणि नेदरलंडमध्येही अशीच स्थिती आहे. बर्फाच्छादित खोऱ्यातील स्वित्झर्लंडमध्ये तापमान २० अंशापर्यंत पोहोचले आहे. हिवाळ्यात बर्फाचे अनेक प्रकारचे खेळ आयोजित करणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये बर्फाची कमतरता भासत आहे. यामुळे रिसॉर्ट बंद पडले आहेत. स्कीयर्सनी गेल्या आठवड्यात फ्रेंच आणि स्विस स्की रिसॉर्ट्सची जी छायाचित्रे पाठवली आहेत,ती चिंता वाढवणारी आहेत. छायाचित्रांत स्पष्ट दिसते की, बर्फाची मोठी चादर लपटलेले पर्वतीय क्षेत्र आता माती आणि गवातात रूपांतरित झाले आहे. हीच स्थिती इटलीचीही आहे. इटलीचे प्रमुख स्की रिसॉर्ट डोलोमाइट्समध्येही बर्फ गायब आहे. यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. हिवाळी सुट्यांमध्ये युरोपातील बहुतांश रिसॉर्टमध्ये पारा सरासरीपेक्षा जास्त आहे. स्विस रिसॉर्ट जीस्टाडने तर पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरने खोऱ्याचे दृश्य दाखवण्याची सुविधा बंद केली आहे. युरोपातील स्की रिसॉर्ट बर्फ नसल्याने सुने-सुने असल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. विंटर स्पोर्ट्स आणि स्कीइंग नसल्याने पर्वतीय क्षेत्रातील ग्रामस्थांना भविष्याची चिंता सतावत आहे. रेस्तराँ, हॉटेल, भाड्याने स्कीइंगचे सामान देणारे, चालकापासून उंच ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्यांचे चेहरे पडले आहेत. अनेक रिसॉर्टचा महसूल गेल्या आठवड्यात युरोपातील बहुतांश देशांत घसरला आहे आणि बर्फवृष्टी सुरू झाली आहे. मात्र, ही स्थिती धोकादायक आहे.
डीट होम निर्मितीमुळे यंदा युरोपमध्ये तापमान जास्त युरोपमध्ये पारा वाढल्याची स्थिती हीट डोममुळे आली. वातावरण उष्ण सागरी हवेला बाटलीत एखाद्या झाकणासारखे बंद करते तेव्ही अशी स्थिती होते. यानंतर ती हळूहळू सोडते. अमेरिकी नॅशनल आेशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननुसार,असे तेव्हा होते जेव्हा प्रशांत महासागरातील एक भाग थंड होतो आणि दुसरा उष्ण होतो.
हिवाळ्यातील विक्रम : चीनच्या मोहेत पारा -५३0 सायबेरियाला लागून चिनी भागात हिवाळ्याचा विक्रम झाला आहे. चीनचे उ.ध्रुव समजल्या जाणारे क्षेत्र मोहे शहरात रविवारी रात्री पारा उणे ५३ अंश सेल्सियस राहिले. हे सर्वात कमी तापमान आहे. शेवटी १९६९ मध्ये पारा उणे ५२.३ अंश राहिले होते. चार दिवसांआधी रशियात सायबेरियाच्या यकुत्स्कमध्ये उणे ६२ अंश पारा नोंदला .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.