आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्कोत राहणाऱ्या एरिका आणि फ्रान्सिस डिसुझा यांच्यातील घटस्फोटाचे प्रकरण सुमारे ८ वर्षे चालले. त्यांचा संसारही ८ वर्षांचाच होता. मुले आणि घराच्या वाटणीपेक्षा फ्रान्सिसने लाखो डॉलरमध्ये खरेदी केलेल्या बिटकॉइनच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद होता.
फ्रान्सिसने २०१३ मध्ये घटस्फोटाआधी एक हजार बिटकॉइन खरेदी केले होते, पण त्याला निम्मी गुंतवणूक गमवावी लागली होती. २०२० मध्ये कोर्टाने फ्रान्सिसला उर्वरित बिटकॉइनपैकी (५०%) ४५ कोटी रुपयांचे चलन पत्नीला देण्याचा आदेश दिला होता. आज या बिटकॉइनचे मूल्य १७३ कोटी रुपये आहे. कायदेशीर वर्तुळात हे प्रकरण पहिल्या बिटकॉइन घटस्फोटाच्या रूपात चर्चेत आहे. पण आता घटस्फोटाच्या प्रकरणांत क्रिप्टोकरन्सी दडवून ठेवल्याबाबतचे वाद समोर येत आहेत.
अनेक जोडपी परस्परांवर आर्थिक गैरव्यवस्थापनाचे आरोप करत आहेत. डायव्होर्स लॉयर जॅकलिन न्यूमॅन यांनी सांगितले की, ‘क्रिप्टोकरन्सी ट्रॅक करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे ही डोकेदुखी झाली आहे. पती-पत्नी होल्डिंग कमी असल्याचे सांगतात. किंवा फंड ऑनलाइन वॉलेटमध्ये लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यात एंट्री करणे कठीण असते. वकील या प्रकरणात फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत आहेत.
ते बिटकॉइनपासून ईथरसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या ऑनलाइन एक्सचेंजपासून डिजिटल वॉलेटपर्यंतच्या ट्रॅकिंगसाठी हजारो डॉलर वसूल करतात.’ सिफरब्लेंड या इन्व्हेस्टिगेटिव्ह फर्मचे फॉरेन्सिक विश्लेषक पॉल सिबेनिक यांनी सांगितले,“मी क्रिप्टोशी संबंधित घटस्फोटांची १०० पेक्षा जास्त प्रकरणे हाताळली आहेत. अनेक प्रकरणांत तर पतीने पत्नीपासून ७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची क्रिप्टो गुंतवणूक लपवून ठेवली होती.’
इन्व्हेस्टिगेटर निक हिमोनिडिस यांनी सांगितले,‘न्यूयॉर्कच्या एका महिलेने पतीवर संपत्ती दडवून ठेवल्याचा आरोप केला होता. न्यायालयाच्या परवानगीने तिने पतीच्या लॅपटॉपची तपासणी केली तेव्हा डिजिटल वॉलेटमध्ये ५.५ कोटी रुपये मोनेरो या क्रिप्टोकरन्सीच्या रूपात मिळाले. आणखी एका प्रकरणात कॉइनबेस या क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर पतीने १५ कोटी रुपये ठेवले होते. घटस्फोटाचा अर्ज देण्याच्या आठवडाभर आधीच पतीने ही रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये ट्रान्सफर करून देश सोडला. एक्सचेंजला ही रक्कम परत करण्यास न्यायालय सांगू शकते. पण ऑनलाइन वॉलेट अॅक्सेससाठी पासवर्ड आवश्यक आहे. त्यामुळे महिलेला रक्कम मिळू शकली नाही.’
पत्नीला क्रिप्टोकरन्सी ट्रॅक किंवा अॅक्सेस करता येऊ नये अशी पतीची इच्छा
डायव्होर्स लॉयर ग्रेगरी सॅलेंट यांनी सांगितले,‘पतीने क्रिप्टोकरन्सी लपवून ठेवली आहे, असा संशय माझ्या अशिलाला होता. मी कॉइनबेसला समन्स पाठवले. त्यांची माहिती कळण्यापलीकडची होती. ट्रॅकिंग केले तेव्हा पतीने क्रिप्टोमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याचे आढळले.’ अॅडव्होकेट कॅली ब्युरिस म्हणाल्या, ‘माझे पुरुष अशील बरेचदा क्रिप्टो लपवून ठेवण्याची योजना घेऊन येतात. पत्नीला ते ट्रॅक किंवा अॅक्सेस करता येऊ नये, असाच या पुरुषांचा हेतू होता.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.