आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:लंडनच्या लक्झरी पुनर्वसन केंद्रात क्रिप्टो ट्रेडिंगचे व्यसन सोडण्यास सुरुवात; 62 लाख रुपयांपर्यंत खर्च

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल चलन क्रिप्टो नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, लोकांसाठी हा मानसिक आजाराचे कारण ठरले आहे. याच्यावरील उपचार लंडनचे लक्झरी पुनर्वसन केंद्र “द बॅलन्स’ने देऊ केले आहेत. जेम्स(नाव बदलले आहे) सेंटर बँक डिजिटल करन्सीच्या ट्रान्झॅक्शनच्या कंपनीत काम करत होता. त्याला क्रिप्टो ट्रेडिंगचे व्यसन लागले. स्थिती हाताबाहेर गेल्यावर त्याने उपचार घेण्याचा निर्णय घेतला. द बॅलन्समध्ये त्याने आपला उपचार करून घेतला. त्याचा खर्च ६२ लाख होता. पॅकेजमध्ये जेम्समध्ये लक्झरी विला, वैयक्तिक नोकर आणि स्वयंपाकी मिळाला. यासोबत योगा, बाइक रायडिंग आणि मसाजचा समावेश होता. द बॅलन्स प्रामुख्याने चिंता, बर्नआउट, नैराश्य, गेमिंग व इटिंग डिसऑर्डरवर उपचार करते.

नुकतेच द बॅलन्ससारख्या अनेक रिहेब सेंटर्समध्ये क्रिप्टोशी संबंधित डिसऑर्डरवर उपचार केला जात आहे. मात्र, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राच्या प्राध्यापक यासाठी आकारल्या जाणाऱ्या फिसचे समर्थन करतात. एना म्हणाल्या, यामध्ये अन्य बायोसायकॉलोजिकल आजारप्रमाणे अन्य थेरपी दिल्या जातात. त्यात व्यक्तीच्या सवयी, वातावरण आणि अॅक्टिव्हिटी बदलून उपचार होतो. यावर स्वतंत्रपणे उपचार सांगून फिस घेतली जाते,जी खूप जास्त आहे. अन्य तज्ज्ञ लिया नॉवर यांच्यानुसार, हे व्यसन सध्या नवे आहे. त्यामुळे जे कन्सल्टंट जुगार, स्पोर्ट्‌स बेटिंग वा लॉटरीवर उपचार करतात तेच क्रिप्टोवरही उपचार करू शकतात.

मर्यादा निश्चित करून व्यसनापासून दूर राहता येईल
क्रिप्टो ट्रेडिंगच्या लक्षणांबाबत बोलायचे झाल्यास, सुरुवातीस ट्रेडिंगचा चढ-उतार व्यक्तीला उत्साहित करतो. हळूहळू व्यक्ती चोरी करतो. झोपत नाही आणि ट्रेडिंगसाठी आपले करिअर, नाते आणि अभ्यासावर पाणी सोडतो. वेळ, जास्त नुकसान आणि लावणाऱ्या पैशाची मर्यादा निश्चित करा.

बातम्या आणखी आहेत...