आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन डीसीमध्ये २० जानेवारीला जो बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. काही दिवसांपूर्वी कॅपिटल बिल्डिंगमध्ये (अमेरिकी संसद भवन) झालेल्या हिंसाचारानंतर आता शपथविधी समारंभावरही हिंसेचे सावट आहे. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था लावली जात आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर आयईडी स्फोटकांचा वापरही होऊ शकतो. शुक्रवारी रात्रीपासून पुढील गुरुवारपर्यंत १३ मेट्रो स्टेशन बंद राहतील. अंतर्गत सुरक्षा विभागाने संसद आणि व्हाइट हाऊसजवळील प्रतिष्ठाने बंद ठेवण्यास सांगितली आहेत. महत्त्वाच्या रस्त्यांवर नॅशनल गार्ड्स तैनात आहेत. सध्या ६,२०० गार्ड्स आहेत, शनिवारपर्यंत आणखी १० हजार तैनात केले जातील. शहरात बाहेरून येणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या फक्त ५०% राहिली आहे.
नौसेना यार्ड निवासी डॅन नेझफेल्ट हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस बिल्डिंगच्या दक्षिणेला ब्लॉक क्रमांक चारमध्ये राहतात. ते म्हणाले की, शपथविधीच्या दिवशी मी कुटुंबासोबत व्हर्जिनियाला जाणार आहे. मी माझ्या श्वानाला जेथे फिरण्यासाठी घेऊन जातो, तेथे गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर पाइप बॉम्ब आढळला. जे शहर सोडून जाऊ शकणार नाहीत अशा लोकांची मला चिंता वाटते.’
कनिष्ठ सभागृहात ट्रम्पविरुद्ध महाभियोग मंजूर; १० रिपब्लिकन खासदारांनी केले क्रॉस व्होटिंग
ट्रम्प यांच्याविरोधात कनिष्ठ सभागृहात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला. त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या १० खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले. प्रस्ताव १९७ विरुद्ध २३२ मतांनी मंजूर झाला. आता सिनेटमध्ये (वरिष्ठ सभागृह) १९ जानेवारीला प्रस्ताव येऊ शकतो. ही प्रक्रिया मार्चपर्यंत चालू शकते. ट्रम्प यांचा कार्यकाळ २० जानेवारीपर्यंतच आहे. एकाच कार्यकाळात दोन वेळा महाभियोग आलेलेे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष आहेत. सिनेटमध्ये १७ रिपब्लिकन खासदारांच्या पाठिंब्याशिवाय प्रस्ताव मंजूर होणार नाही.
२० ते २५% लोक शहर सोडण्याच्या तयारीत
एफबीआय या गुप्तचर संस्थेने वॉशिंग्टनमध्ये पुन्हा हिंसाचाराची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे २० ते २५ टक्के लोक शपथविधीच्या दिवशी आपले घर सोडून इतर शहरांत आश्रय घेण्याच्या तयारीत आहेत.
‘पॅट्रियट अॅक्शन्स फॉर अमेरिका’ हा गट हिंसेसाठी लोकांना चिथावत आहे. त्यामुळे कर्फ्यूसारखी स्थिती आहे. रस्ते बंद केले जात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.