आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिज्ञासेमुळे शिकण्याबराेबरच स्मरणशक्ती, सृजन वाढू शकते; कामातही लक्ष लागते!

वाॅशिंग्टन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात कायम जिज्ञासा असली पाहिजे. त्यातून आपल्याला शिकण्यासाठी मदत हाेते. तणाव दूर हाेऊ शकताे. स्मरणशक्ती तसेच सृजनही वाढू शकते. एवढेच नव्हे तर नाेकरी किंवा एखाद्या कामातही लक्ष लागते. जीवनात जिज्ञासेचे किती महत्त्व आहे आणि ते कसे उपयाेग ठरते, याबद्दल अनेक संशाेधने झाली. याद्वारे हाेणारे फायदे लक्षात घेण्याचा उद्देश हाेता.

कॅलिफाेर्निया विद्यापीठातील एका संशाेधनानुसार तथ्ये लक्षात राहण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढते. एखादी नवीन गाेष्ट किंवा काही कठीण शिकताना कुतूहल आपल्या स्मरणशक्तीसाठी जणू टाॅनिकचे काम करते. त्यातून आपल्या हातचे काम अधिकच आकर्षक वाटू लागते आणि आपले मनही तेथे रमते. म्हणूनच आपण अधिक मन लावून काम करू लागताे आणि त्यामधील तथ्ये लक्षात राहतात. कुतूहलातून आपली सृजनशक्तीही वाढते.

समस्यांचे निराकरण करण्याचे काैशल्यही येते. त्याचबराेबर कामे कल्पकतेने पार पाडली जाऊ शकतात. या अध्ययनात अमेरिका व जर्मनीच्या उद्याेगांतील ८०० हून जास्त जणांनी सहभाग घेतला हाेता. सहभागी लाेकांनी आपल्याला दैनंदिन जीवनात जिज्ञासेमुळे झालेल्या फायद्याचे मूल्यमापन केले. लहान मुलांमध्ये कुतूहल जास्त प्रमाणात असते. परंतु वय वाढत असताना मात्र ही सवय कमी हाेत जाते.

शैक्षणिक यश मिळण्याची शक्यता जास्त जिज्ञासेमुळे आपल्यातील धैर्यही वाढू लागते. ड्यूक विद्यापीठातील पीएचडीचे विद्यार्थी अबिगॅल हिसंग म्हणाले, लाेक समाधान शाेधण्यासाठी प्रतीक्षा करण्यास तयार असतात. त्याचबराेबर त्यातून कठीण कामे व शिक्षणातील समजही वाढते.

बातम्या आणखी आहेत...