आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Cyber Attack । United States OF America । Biden Administration Declares Emergency । Keep Fuel Supply Lines Open

सायबर हल्ला:अमेरिकेतील सर्वात मोठ्या तेल पाइपलाइनवर सायबर हल्ला, बायडेन प्रशासनाने लागू केली आणीबाणी

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॅकर्सकडून 100GB डेटाची चोरी करुन खंडनीची मागणी

अमेरिकेतील सर्वात मोठ्या तेल पाइपलाइनवर सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर बाइडेन प्रशासनाने आणीबाणीची घोषणा केली आहे. ज्या कोलोनियल पाइपलाइन कंपनीवर हा सायबर अटॅक झाला, ती कंपनी दररोज 25 लाख बॅरेल कच्चा तेलाचा पुरवठा करते. येथून पाइपलाइनद्वारे अमेरीकेच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल, डीझेल आणि इतर गॅसचा सप्लाय होतो.

शुक्रवारी हॅकर्सनी या पाइलपालनच्या सायबर सिक्योरिटीवर हल्ला केला होता. याला अद्याप ठीक करण्यात आलेले नाही. दरम्यान, रिकव्हरी टँकर्सद्वारे तेल आणि गॅसचा पुरवठा न्यूयॉर्कपर्यंत केला जात आहे. सायबर हल्ल्याचा परिणाम अटलांटा आणि टेनेसीवर सर्वात जास्त पडला आहे. काही काळानंतर न्यूयॉर्कपर्यंत याचा परिणाम दिसू शकतो. रविवारी रात्रीपर्यंत कंपनीच्या 4 मेन लाइन बंद पडल्या आहेत. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीने आपल्या काही लाइन्स बंद केल्या आहेत.

वाढू शकते तेलाची किंमत

कोरोना महामारीमुळे कंपनीचे बहुतेक इंजीनिअर वर्क फ्रॉम होम करत आहेत, यामुळेच हैकर्स इतका मोठा हल्ला करू शकले. सायबर अटॅकमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या किमतीत 2 ते 3% वाढ होऊ शकते.

हॅकर्सनी 100GB डेटा चोरला

या सायबर अटॅकचा आरोप डार्कसाइड नावाच्या सायबर गुन्हे करणाऱ्या गँगवर लावण्यात आला आहे. यांनी कोलोनियल कंपनीच्या नेटवर्कला हॅक करुन 100GB डेटा चोरला असून, या डेटाच्या बदल्यात खंडनीची मागणी केली आहे. पैसे न मिळाल्यास डेटा इंटरनेटवर लीक करण्याची धमकीदेखील दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...