आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दैनिक भास्कर’चा सन्मान:कोविड काळातील सत्य, बिनधास्त पत्रकारितेसाठी न्यूयॉर्कमध्ये झाला सत्कार

न्यूयॉर्क10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील सर्वात मोठे वृत्तपत्र म्हणून ओळख असलेल्या दैनिक भास्करला कोविड काळात प्रसिद्ध केलेल्या सत्य व बिनधास्त बातम्यांसाठी राजस्थान असाेसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (राना)च्या वतीने न्यूयॉर्कमध्ये २० नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले.

न्यूयॉर्कच्या केरिस्ट हॉलो कंट्री क्लबमध्ये आयोजित समारंभात कौन्सिल जनरल ऑफ न्यूयॉर्क रणधीर जायसवाल यांनी भास्करला सन्मानित केले. या वेळी दैनिक भास्करच्या वतीने सत्य व बिनधास्त बातम्यांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी ४५० एनआरआय, उद्योगपती, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. भास्करच्या वतीने नॅशनल एडिटर ओम गौड, एल. पी. पंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी अमेरिकेत भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून आला. रानाचे अध्यक्ष प्रेम भंडारी यांनी सांगितले, की दैनिक भास्कर जगातील एकमेव असे वृत्तपत्र आहे जे “नो निगेटिव्ह’ बातम्या प्रसिद्ध करतो. जनहितार्थ व सकारात्मक पत्रकारितेसाठीही तो ओळखला जातो.

या समारंभात जयपूर फूटचे संस्थापक पद्मभूषण डी. आर. मेहता व प्रसिद्ध इन्व्हेसिव्ह कार्डिओलॉजिस्ट डॉ. समीन शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीप महोत्सव समारंभात फ्लोरिडातून डॉ. राज बन्सल, कॅनडाहून डॉ. साधना जोशी, राजेश गोयंका व कॅलिफोर्नियातून डॉ. शुभा जैन यांचाही सन्मान करण्यात आला. सोबत धर्मचंद हिरावत, डॉ. अजय लोढा व राजीव गर्ग यांचा रानासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मरणोत्तर सन्मान करण्यात आला. दीप महोत्सवाचे चेअरमन डॉ. विजय आर्य व सचिव रवी जांगिड यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...