आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Damiyana Nasser | Marathi News |Damiyana Nasser Who Somehow Learned, Never Acted; The First Film Won A Cannes Award For Best Actress

दिव्य मराठी विशेष:कशीबशी शिकणाऱ्या नासरने कधी अभिनय केला नाही; पहिल्याच चित्रपटाला कान्स पुरस्कार, झाली अभिनेत्री

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजिप्तमधील खेडेगाव अल बाशराच्या ४० वर्षीय दमियाना नासरने कधीही अभिनय केला नव्हता. कधी शाळेतही गेली नाही. फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून कसेबसे अरबी शब्द वाचणारी दामियाना आज चित्रपटतारका आहे. प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात तिचा पहिला चित्रपट “फेदर्स’ने(पंख) दोन श्रेणीत पुरस्कार जिंकले. दामियाना आठ भाऊ-बहिणींसोबत नील नदीकिनाऱ्यावरील आपल्या गावात राहत होती. ती भावांसोबत शेतात काम करताना चित्रपटांबाबत चर्चा करत असे. चित्रपटांत काम करणारे शिकलेले असतात असा तिचा समज होता. त्यामुळे चित्रपटात कधी काम करू शकणार नाही असे तिला वाटले. १९ व्या वर्षी दामियानाचे लग्न झाले.

कोपटिक (ख्रिश्चन) कुटुंबातील दामियाना लग्नानंतर घरात रुळली. एके दिवशी १९ वर्षांच्या मुलीने घरी सांगितले की, एक चित्रपट दिग्दर्शक ओमार जोहारी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. ऑडिशन टेस्टमध्ये दामियाना निवडली गेली. कारण, ती जे काही अनेक वर्षांपासून करत आलेली कामेच तिला चित्रपटात करायची होती. उदा. घरातील कामे करणे, मुलांना अंघोळ घालणे आणि कपडे धोणे.

दामियानाने चित्रीकरणादरम्यान व्यक्तिरेखा चांगली साकारली. कान्समध्ये पुरस्कार जिंकल्यानंतर दामियाना इजिप्त चित्रपट उद्योगात नावारूपाला आली. तिचे फेसबुकवर ४७ हजारांवर फॉलोअर्स आहेत.

चित्रपटात दामियानाच्या पतीस जादूगार कोंबडा बनवतो
चित्रपट फेदर्सच्या माध्यमातून देशाची परंपरावादी प्रतिमा सादर केल्याचा इजिप्त सरकारला आक्षेप आहे. सरकारने चित्रपट इजिप्तमध्ये प्रदर्शित करण्यावर बंदी घातली आहे. चित्रपटात दामियानाच्या मुलाच्या जन्मदिनी एक जादूगार तिच्या पतीला कोंबडा करतो. यानंतर दामियानाचे आयुष्य संकटांनी घेरले गेले. पती कोंबडा झाल्यामुळे ती घरकर्ज फेडू शकत नव्हती.

बातम्या आणखी आहेत...