आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानच्या कंधारमध्ये तालिबान आणि सुरक्षा दलातील चकमकीदरम्यान भारतीय छायाचित्रकार डॅनिश सिद्दीकी हे ठार झाले आहे. दानिश सिद्दीकी हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. त्यांना रोहिंग्या कव्हरेजसाठी 2018 मध्ये पुलित्झर पुरस्कार देण्यात आला होता.
टोलो न्यूजच्या म्हणण्यानुसार, दानिश गेल्या अनेक दिवसांपासून स्पिन बोल्डक जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीला कव्हर करत होते. अफगाणिस्तानाचे विशेष सैन्य बचाव मोहिमेवर असताना दानिश त्यांच्यासमवेत उपस्थित होते. दानिशने गेल्या तीन दिवसांपूर्वी आपल्या ट्विटरवरुन याचा उल्लेख केला होता.
स्पेशल फोर्सेसचा मिशन कव्हर करत आहे - दानिश
दानिशने 13 जुलै रोजी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये म्हटले होते की, मी या मिशनमध्ये या तरुणांसोबत आहे. हे स्पेशल फोर्सेस आज कंधार येथे रेस्क्यू मिशनवर आहे. यापूर्वी हे संपूर्ण फोर्स एका कॉम्बॅट मिशनवर असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या आठवड्यात तालिबानने स्पिन बोल्डक जिल्ह्यावर ताबा घेतला होता. तेव्हापासून दोघांमध्ये अनेक चकमकी घडत आहे. मी हे मिशन कव्हर करत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटरवरुन सांगितले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.