आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अंटार्क्टिका'वर अंधाररात्र सुरू:सूर्य असा मावळला की आता 6 महिन्यांनंतरच उगवणार, -80 अंश तापमानात राहणार संशोधक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'एखादी रात्र काही तासांऐवजी तब्बल 6 महिन्यांची असेल तर काय होईल?' विचार करा. एका ठराविक कालावधीनंतर आपल्याला या अंधाराचा कंटाळा येईल. त्यात राहणे अवघड होईल. आपल्या मनात आपल्या जीवनातच अंधःकार पसरल्याची भावना निर्माण होईल. पण, अंटार्क्टिकाच्या बाबतीत हा संदर्भ केवळ एक कल्पना नाही तर वास्तव आहे. येथे गत 13 मे रोजी सूर्य मावळल्यानंतर तब्बल 6 महिन्यांची लांबलचक रात्र सुरू झाली आहे.

अंतराळपटूंसाठी सुवर्णसंधी

जगभरातील नागरिकांसाठी आर्क्टिकवरील अंधाराचे 6 महिने आयसोलेशन म्हणजे विलगीकरण व रक्त गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे असू शकतात. पण, अंतराळपटूंसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या दिवसांत ते आपल्या अंतराळ मोहिमेचा अभ्यास करतात. पृथ्वीच्या काही सर्वात कठीण स्थितीत राहण्याचा अभ्यास करतात.

विनासूर्यप्रकाश व अशा कठीण परिस्थितीत अंतराळपटू या 4 महिन्यांचा वापर आपल्या प्रशिक्षणासाठी करतात. जगातील उर्वरित देशांतील लोक 3 प्रकारच्या हंगामांत राहतात. पण, आर्क्टिकमध्ये केवळ 2 ऋतु असतात. उन्हा व हिवाळा. जगातील या सर्वाधिक शित प्रदेशात 6 महिने दिवस व उर्वरित 6 महिने काळ्या रात्री असतात.

अंतराळासारख्या स्थितीत राहणार 12 जण

आर्क्टिकच्या दूरस्थ कॉनकॉर्डिया तळ पुन्हा एकदा यूरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या 12 सदस्यीय पथकाचा तळ बनेल. हे 12 संशोधक येथे विलगीकरणात राहून आपले संशोधनकार्य सुरू ठेवतील. त्यांच्या मोहिमेत अनेक प्रकारच्या संशोधनांचा समावेश आहे. ते टोकाच्या स्थितीत मनुष्य स्वतःचा बचाव करू शकतो, याचा इत्यंभूत अभ्यास करतील. स्पेस एजंसीने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, झोपेच्या अभ्यासापासून पोटाच्या आरोग्यापर्यंत वर्तमान व भविष्याच्या संशोधकांना अंतराळासारख्या टोकाचे वातावरण समजण्यासाठी या आव्हानांचा सामना करताना त्यांच्या दिमतीला एक चालक दलही असेल.

-80 अंश सेल्सिअसपर्यंत कोसळू शकते तापमान

स्पेस एजंसीने म्हटले की, ही स्थिती एखाद्या दुसऱ्या ग्रहावर राहण्यासारखी आहे. कॉनकॉर्डिया स्थानकावर राहणाऱ्या संशोधकांना यापुढे कोणतीही मदत मिळणार नाही. पुरवठ्याची शेवटची खेप येथे फेब्रुवारीत पोहोचली होती. यासंबंधीच्या माहितीनुसार, या तळावर किमान 9 महिने पुरेल एवढी साधन सामग्री आहे. भविष्यात येथील तापमान उणे 80 अश सेल्सिअसपर्यंत कोसळू शकते.

बातम्या आणखी आहेत...