आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डार्ट मिशन:लघुग्रहाचा मार्ग वळवणार; नासाने रवाना केले यान, संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न

जाेए राॅलेट8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खगाेलशास्त्रज्ञांनी २०१७ मध्ये क्रूझ जहाजाच्या आकाराएवढ्या लघुग्रहाचा शाेध लावला हाेता. हा लघुग्रह जपानवर आदळेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज हाेता. त्यानंतर नासा व इतर अंतराळ संस्थांच्या संशाेधक, अधिकारी व टाेकियाेतील वार्षिक ग्रह संरक्षण संमेलनात जमलेल्या तज्ज्ञांनी लघुग्रहाचा मार्ग वळवण्याची याेजना तयार केली हाेती. खरे तर लघुग्रह धडकण्याची घटना अद्याप घडलेली नाही. त्याचाच भाग म्हणून बुधवारी पहाटे कॅलिफाेर्नियातून नासाने स्पेसएक्स कंपनीचे राॅकेट डबल एस्ट्राॅइड रिडायव्हेशन टेस्टच्या (डार्ट) माध्यमातून अंतराळात यान रवाना केले आहे. लघुग्रहाचा मार्ग वळवणे असा त्याचा उद्देश आहे.

२४०० काेटींचे मिशन
डार्ट मिशनवर ३२.४ काेटी डाॅलर (सुमारे २४०० काेटी रुपये) हाेणार आहेत. या पहिल्या प्रयाेगाविषयी नासाचे प्रमुख संशाेधक थाॅमस जुबुरशेन म्हणाले, एखाद्या संकटाला कशा प्रकारे टाळले जावे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सध्या काही धाेका नाही
डायफाॅरमिसपासून पृथ्वीला तूर्त काही धाेका नाही, परंतु पृथ्वीच्या जवळील अर्थ आॅब्जेक्ट्स म्हणजे इतर लघुग्रह व धूमकेतू इत्यादी आहेत हे लक्षात घ्यावे लागेल.

अंतराळात २७ हजार लघुग्रह
संशाेधकांनी १० हजार लघुग्रहांचा शाेध लावला आहे. नासाच्या स्पेस टेलिस्कोप वाइड-फील्ड इन्फ्रारेडच्या पाहणीत एक्सप्लोररने सुमारे २७ हजारावर लघुग्रहांच्या शोधात मदत केली. सर्व लघुग्रह शोधण्यासाठी आणखी ३० वर्षे लागतील.

पुढील वर्षी टक्कर : लघुग्रहाच्या कक्षेत बदलाचे आव्हान
नासाच्या डार्टचे ५४४ किलाे वजन आहे. त्याचे लक्ष्य डायमाॅरफस नावाच्या लघुग्रहाच्या मार्गात बदल करणे हाेय. डायमाॅरफस सुमारे ५२५ फूट रुंद आहे. डिडीमाॅस नावाच्या एका माेठ्या लघुग्रहाभाेवती त्याची परिक्रमा सुरू आहे. त्याची रुंदी २५०० फूट आहे. दाेन्ही मिळून सूर्याभाेवती परिक्रमा करतात. डायफाॅरमसची डार्टशी पुढील वर्षी सप्टेंबर किंवा आॅक्टाेबरमध्ये टक्कर हाेण्याची शक्यता आहे. डार्टचा वेग ताशी १५ हजार मैल असेल. तेव्हा दाेन्ही पृथ्वीपासून १.१ काेटी किलाेमीटरवर असतील.

बातम्या आणखी आहेत...