आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Dawood ibrahim death update dawood ibrahim in pakistan karachi news today updates on underworld don coronavirus rumours

दाउदचा मृत्यू? :भारताचा मोस्ट वॉन्टेड दाउद इब्राहीमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा, अनीसने आधीच स्पष्ट केले दाउदला कोरोना नाही

मुंबई / इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दाउदचा भाऊ आधीच म्हणाला, दाउद तर सोडा डी कंपनीच्या कुठल्याही सदस्याला कोरोना नाही

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अनेक भारतीय माध्यमांनी त्याचा मृत्यू झाला असे वृत्त देखील शनिवारी प्रसारित केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी काही माध्यमांनी दाउदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त दिले. एवढेच नव्हे, तर त्याला कराची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा केला. केवळ दाउद नव्हे, तर त्याच्या पत्नीला सुद्धा कोरोना झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आता मात्र चक्क दाउदचा मृत्यू झाला अशी चर्चा सुरू आहे. परंतु, दाउदला कोरोनाची लागण झाली किंवा त्याचा मृत्यू झाला यापैकी कुठल्याही वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही.

दाउदला कोरोना झाल्याचे वृत्त प्रसारित झाले त्याच दिवशी दाउदचा छोटा भाऊ अनीस इब्राहीमने त्याला कोरोनाची लागण झालीच नाही असे स्पष्ट केले. अनीसने हे देखील सांगितले होते की दाऊदची माणसं आता दुबई आणि पाकिस्तानात बिझनेस करत आहेत. दाउदचा भाऊ अनीसने वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली तरीही त्याचा ठाव-ठिकाणा अद्याप स्पष्ट झाला नाही. दाउद तर सोडाच डी कंपनीतील कुठल्याही सदस्याला अद्याप कोरोनाचे संक्रमण झालेले नाही असा दावा अनीसने केला होता. दाउद संदर्भात बातम्या प्रसारित करताना भारतातील स्थानिक आणि राष्ट्रीय माध्यम गुप्तचर यंत्रणांचा दाखला देत होते.मीडिया रिपोर्टनुसार, दाउद कराचीतच राहत असून पाकिस्तानी लष्कराचे गुप्तचर विभाग आणि आयएसआय त्याच्यावर नजर ठेवून आहेत.

1993 च्या बॉम्बस्फोटानंतर दाउद इब्राहीम मुंबई आणि देश सोडून पसार झाला. तेव्हापासूनच तो पाकिस्तानात राहत असून त्याला आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण आहे. तो मुंबई बॉम्बस्फोटांसह भारतातील अनेक स्फोट आणि हिंसाचाराचा आरोपी आहे. परंतु, दाउद किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कुणीही पाकिस्तानात नाही असे वेळोवेळी पाकिस्तानच्या वतीने सांगितले जाते. दाउदच्या मुलीचा विवाह पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियादादचा मुलगा जुनैदशी झाला आहे.

0