आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Dead Bodies Piled Up On The Road, Someone's Head Pierced By A Bullet, While Someone's Limbs Were Tied

युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे कौर्य:रस्त्यावर मृतदेहांचा खच, कुणाचे डोके गोळीने भेदलेले, तर कुणाचे हात-पाय बांधलेले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाचा आज 40 वा दिवस आहे. युक्रेनमध्ये रशियाने क्रुरतेचा कळस गाठला आहे. युक्रेनच्या शहरांमध्ये रस्त्यावर लोकांचे मृतदेह आढळत आहेत. सध्या कीव्ह शहरामध्ये भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. राजधीनी कीव्हच्या लगत असलेल्या बुचा शहरामधील रस्त्यावर 400 पेक्षा अधिक मृतदेह आढळून आले आहेत. या मृतदेहांना दफन करण्यासाठी 45 फूट कबर खोदण्यात आली आहे.

हा सॅटलाईटने काढण्यात आलेला फोटो आहे. 45 फूट जागेत कबर खोदण्यात आली आहे.

अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नोलॉजीजने काही सॅटलाईट फोटोज जारी केले आहे. या फोटोमध्ये सेंट अंड्रयू आणि पायरवोज्वनोहो ऑल सेंट्सच्या चर्चमध्ये 45 फूट कबर पाहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, कबरेच्या वरची माती ही पूर्णपणे लाल असल्याचे दिसून येत आहे.

मृतदेह दफन करण्यासाठी बुचा शहरात 45 फूट कबर खोदण्यात आली.

रशियन सैन्याने लोकांचे हात मागे बांधून डोक्यात गोळी घातली.

बुसा शहरातून मागे हटताना रशियन सैन्यांनी रागाच्या भरात सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या.

बुचा शहरातील एका गल्लीमध्ये कमीत-कमी 20 मृतदेह आढळल्याचे मेयर अनातोली फेडोरुकने सांगितले.

‘नरसंहार’ केल्याचा आरोप युक्रेनने रशियावर केला आहे.

एका रिपोर्टनुसार, कबरवरची माती रक्ताने पूर्णपणे लाल झाली होती.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबका यांनी यांनी रशियन सैन्य हे दहशतवादी संघटना ही ISIS पेक्षा वाईट असल्याचे म्हटलं.

बुचा शहरामध्ये भयावह चित्र पाहायला मिळत आहे.

अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी आणि यूरोपीय यूनियन (EU) ने याला गंभीर युद्ध अपराध म्हणत, रशियाची निंदा केली.

संयुक्त राष्ट्र महासचिव एन्टोनियो गुतरेस यांनीदेखील याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...