आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डिअर सांता, वर्ष कठीण आहे, आई म्हणतेय- गिफ्टसाठी तिच्याकडे पैसे नाहीत, आता तूच मला खेळणी दे

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी पाेस्टर सेवेतील आॅपरेशन सांताकडे लहानग्यांचे भावनिक पत्राद्वारे गाेड गाऱ्हाणे

जेनी ग्राॅस
‘डिअर सांता. काेराेनामुळे यंदाचे वर्ष कठीण राहिले. यंदाच्या नाताळला मला खेळणीचा सेट मिळेल असे मनात वाटत हाेते, परंतु तिला आता पूर्वीसारखे पैसे मिळत नाहीत असे आई सांगते. ती खेळणी आणू शकत नाही. म्हणूनच तू आता मला खेळणी दे,’ हे शब्द आहेत नऊ वर्षीय एलानीचे. या चिमुरडीने लाडक्या सांताक्लाॅजकडे पत्राद्वारे गाेड गाऱ्हाणे मांडले आहे. अशाच प्रकारची भावना इलिनाॅय येथे राहणाऱ्या चार मुलांची आई ग्लेंडा यांनी पत्राद्वारे व्यक्त केली. ‘डिअर सांता..काेराेनामुळे माझे कामाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळे माझी कमाईदेखील कमी झाली. पण माझ्या मुलांनी दरवर्षीसारखा यंदाचाही नाताळ साजरा करावा असे मला मनापासून वाटते. त्यासाठी मात्र तुझ्या मदतीची गरज आहे.’अमेरिकेतील पाेस्टर सेवा आॅपरेशन सांताला यंदा आतापर्यंत २३ हजारांहून जास्त पत्रे मिळाली आहेत.

आॅपरेशन सांता गेल्या १०८ वर्षांपासून चालवले जाते. मुले किंवा त्यांचे नातेवाईक १२३, एल्फ राेड, नाॅर्थ पाेल, ८८८८८ या पत्त्यावर दरवर्षी सांता क्लाॅजला पत्र पाठवतात. यंदाच्या पत्रात मुलांनी काेराेनामुळे येत असलेल्या अडचणी सांगितल्या. काही मुलांनी सांताकडे काेराेना लसीची मागणी केली आहे. काहींनी कुटुंबातील सदस्यांना आराेग्य मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. काही मुलांनी सांताला तुझ्याकडे महामारीवर ताेडगा आहे का? असा थेट प्रश्न केला आहे. प्ले स्टेशन, गर्ल्स डाॅलसह इतर खेळणींची मागणी करणारीही अनेक पत्र मिळाली आहेत. अमेरिकी पाेस्टल सर्व्हिस या पत्रांना जाहीर करते. लाेक या पत्रापैकी एकाची िनवड करून सांताची भूमिका निभावते आणि मुलांच्या पसंतीचे सामान आणते. गिफ्ट पाठवणारे आपली आेळख जाहीर करत नाहीत.

कठीण वर्ष येताच पत्रसंख्येत वाढ :पाेस्टल सेवेच्या म्हणण्यानुसार यंदा लाेकांनी खूप दयाभाव दर्शवला आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व पत्रांमध्ये सर्वांनी काेणाला ना काेणाला तरी अॅडाॅप्ट केले आहे. म्हणजे पत्र पाठवणाऱ्या सर्व मुलांना भेटवस्तू मिळणार आहे. पाेस्टल सर्व्हिसचे प्रवक्ते किम फ्रूम म्हणाले, कठीण वर्ष येते तेव्हा सांताच्या नावाने येणाऱ्या पत्रांची संख्या वाढते. साेबतच पत्रांना अॅडाॅप्ट करणाऱ्यांची संख्यादेखील वाटते. २००८ मध्ये असे घडले हाेते. तेव्हा अमेरिकेसह जगभरात आर्थिक मंदी आली हाेती.

बातम्या आणखी आहेत...