आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मानवी जमातीचा शेवट:26 वर्षांपासून कुणाशीही न बोललेल्या ‘मॅन ऑफ द होल’चा मृत्यू; जंगलात लटकता मृतदेह आढळला

रिओ दि जानेरिओ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील एका मानवी जमातीचा शेवट

२३ ऑगस्टला ब्राझीलच्या जंगलात लटकता मृतदेह आढळला. त्यासोबतच एक पूर्ण मानव जमात संपुष्टात आली. एका भाषेचा अंत झाला. हजारो वर्षांत अनेक पिढ्यांचे ज्ञानही अस्ताला गेले. तो आपल्या मानव जातीतील शेवटचा मनुष्य. २६ वर्षांत तो कुणाशीही बोलला नाही. आपल्या जवळपास १०-१० फूट खोल खड्डे खोदायचा. शिकारीसाठी त्यात बाण रोवायचा. त्यामुळे लोक त्याला ‘मॅन ऑफ द होल’ म्हणत.

त्याचे वय अंदाजे ६० वर्षे असावे. त्याने स्वत:साठी झोपडी बनवली होती. शिकार करायचा. कंदमुळे खाऊन जगायचा. त्याची आभूषणे आणि भांडी दुसऱ्या मानव जमातीसारखीच होती. २०१८ मध्ये ब्राझीलच्या सरकारी संस्थेने त्याचे चित्रण केले होते. त्याच्या मृतदेहासमवेत एका पाखराचे पंखही मिळाले आहेत. तो आपल्या मृत्यूची वाट पाहात असावा, असा अंदाज आहे.

मानवी जमातींचा अभ्यास करणारे जाणकार मार्सेलो दोस संटोस म्हणाले की, त्याला आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी. संटोस सांगतात की, ७० च्या दशकात अवैधपणे जंगल तोडून शेती तयार केली जात होती. अनेकांना ठार करण्यात आले. हा नरसंहार होता. ९० च्या दशकात जमिनीवर कब्जा करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना विष दिले. १९९५ मध्ये या मानवी जमातीतील ६ व्यक्तींना गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर ‘मॅन ऑफ द होल’ एकटाच वाचला होता. १९९६ मध्ये संटोस यांच्या टीमने पहिल्यांदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला मका आणि बाण दिले. मात्र तो आक्रमक व्हायचा. त्यानंतर त्याचा परिसर २०२५ पर्यंत संरक्षित करण्यात आला. तेथे बाहेरील कुणालाही प्रवेश नव्हता. ब्राझीलमध्ये मानव जमातींचे सरंक्षण करणाऱ्या फुनाई संस्थेनुसार, या जंगलात ११४ मानव जमाती आहेत. मात्र त्यातील २८ जमातींचेच अस्तित्व निदर्शनास आले आहे.

इतर अनेक जाती धोक्यात

  • १९९० मध्ये ब्राझीलच्या जंगलात जमिनीसाठी अकुंत्सू जमातीचा नरसंहार झाला. ते जंगलात आणखी दूर गेले. २०१९ पर्यंत फक्त ४ लोक वाचले होते.
  • पीरीपकुरा जमातीच्या ३ व्यक्ती जिवंत आहेत. २ पुरुष आणि १ महिला. महिला प्रजननाच्या स्थितीत नाही.
  • अंदमान निकोबारमधील बोआच्या मृत्यूनंतर बो जमात संपुष्टात आली. त्याचा मृत्यू २६ जानेवारी २०१० ला झाला. तो बो भाषा बोलणारा शेवटचा व्यक्ती.
  • लात्वियात समुद्रकिनारी राहणाऱ्या रॅनडलिस्टची संख्या २०१८ पर्यंत केवळ २०० उरली होती. युद्ध आणि हल्ल्यामुळे ही संख्या घटत गेली.
बातम्या आणखी आहेत...