आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस केंटकीमध्ये पूर, 25 लोकांचा मृत्यू:मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 मुलांचा समावेश, 50 हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत हवामान बदल झपाट्याने होत आहेत. देशाचा पश्चिम भाग तीव्र उष्णता आणि दुष्काळाने होरपळत असताना, दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला आहे. केंटकी राज्यात 27 जुलैपासून पावसामुळे पूर आला आहे. येथे किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे. पावसामुळे 25,000 हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. गंभीर परिस्थिती पाहता आणीबाणी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून शर्थीचे बचावकार्य सुरू आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

केंटकीच्या पुरात अनेक घरे बुडाली. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. सखल भागात राहणाऱ्या लोकांना आता घरे वाहून जाण्याची भीती आहे.

पुरामुळे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. आपत्कालीन सेवा कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

केंटकीच्या विविध ठिकाणी गंभीर अवस्थेत अडकलेल्या 300 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

हा फोटो क्लो एडम्सची (17) आहे. जेव्हा पूर आला तेव्हा क्लो तिच्या कुत्र्यासोबत व्हाईट्सबर्ग येथील तिच्या घरी होती. जीव वाचवण्यासाठी ती घराच्या छतावर चढली होती.

रात्र झाल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्याचे आपत्कालीन सेवेतील अधिकाऱ्याने सांगितले.

पुरामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. तर रस्त्यावर कचरा जमा झाला. ते हटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...