आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशावर हल्ल्यातील मृतांचा आकडा शंभरवर:जबाबदारी निश्चित करण्यासाठी संयुक्त अधिवेशन घ्या : खासदार

इस्लामाबाद/कराची2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरिबी असूनही सेना, पोलिसांना अब्जावधी डॉलर मिळाले, मात्र हल्ले रोखू शकले नाही : खासदार

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या मंगळवारी १०० वर पोहोचली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनस्थळावरील ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. पेशावर पोलिस नियंत्रण कक्षानुसार, २२१ जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात नेले आहे. त्यापैकी १०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राजधानी इस्लामाबादमध्ये संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अतिरेकी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. खासदारांनी या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.

जमात-ए-इस्लामी पार्टीचे खासदार मुश्ताक अहमद यांनी सल्ला दिला की, अधिवेशनात संबंधित अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीसाठी जबाबदार ठरवले जावे. आपला देश गरीब असतानाही सशस्त्र दल, न्यायपालिका आणि पोलिसांना अब्जावधी डॉलर देत आहे. त्यामुळे संस्थांना हे विचारण्याचा अधिकार आहे की, अशा घटना का घडत आहेत. तसचे गुप्तचर संस्था हल्ले रोखण्यासाठी का अपयशी ठरत आहेत?

ड्युरंड रेषेवर इस्लामिक अमिरात बनवण्याची टीटीपीची इच्छा
टीटीपीने गतवर्षी आपल्या कमांडरच्या हत्येनंतर पाकिस्तानविरुद्ध हल्ला करण्याची घोषणा केली होती. टीटीपीने तेव्हा पाकिस्तानला इशारा दिला होता की, आम्ही कथित ड्युरंड रेषेच्या दोन्ही बाजूस इस्लामिक अमिरात स्थापन करू. यात पेशावर, खैबर पख्तुनख्वा, मलकंद, मर्दन, डेरा, इस्माइल खान, बन्नू, कोहाट व झोब आहेत. त्यात टीटीपी सक्रिय. आहे. हे क्षेत्र २ प्रांतात विभागले असून अफगाणिस्तानच्या क्षेत्रात त्याचे नियंत्रण आहे.

२२ वर्षांत १५९९७ अतिरेकी हल्ले, या वर्षांमध्ये झाले ३१ हल्ले
पाकिस्तानमध्ये गेल्या २२ वर्षांत १५,९९७ अतिरेकी हल्ले झाले. या हल्ल्यांत २८,९१८ लोक(नागरिक व जवान) मारले गेले. म्हणजे, रोज सरासरी ४ लोकांचा मृत्यू झाला. या वर्षी ३० जानेवारीपर्यंत पाकिस्तानमध्ये ३१ अतिरेकी हल्ले झाले. यामध्ये ४ नागरिकांसह १४० जवानांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये ३६५ हल्ले झाले. त्यात २२९ लोक मारले गेले. ३७९ जवानांचे प्राण गेले. २०२१ मध्ये २६७ हल्ल्यांत २१४ नागरिक व २२६ जवान मृत्युमुखी पडले.

टीटीपीला तालिबानची मदत, पाकच्या दुबळेपणाचा फायदा
हल्ल्यात मारल्या गेलेल्या आत्मघाती हल्लेखोराचे शीर जप्त केले आहे. टीटीपी कमांडर उमर खालीद खुरासनी यांच्या भावाच्या दाव्यानुसार, हल्ला त्याच्या भावाच्या हत्येचा बदला आहे. टीटीपीजवळ मोठी संचालन क्षमता, बळकट राजकीय पोहोच आणि ७ अब्ज डॉलरची अमेरिकी लष्करी उपकरणे आहेत. त्याला शेजारी देशाच्या सत्तेचा थेट पाठिंबा मिळाला आहे. संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचा तो अंदाज घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...