आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Death Toll Multiple Blasts Outside Girls School Kabul Saturday Death Rises Over 50, More Than 150 Others Wounded

काबुलमध्ये दहशतवादी हल्ला:शाळेबाहेर झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये 55 जणांचा मृत्यू, 150 पेक्षा जास्त जखमी

काबुलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिका म्हणाला- अफगानिस्तानच्या भविष्यावर हल्ला

अफगानिस्तानची राजधानी काबुलच्या पश्चिम भागात एकानंतर एक झालेल्या तीन बॉम्ब ब्लास्टमध्ये आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 150 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफने यांनी या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे म्हटले आहे. अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचे जबाबदारी घेतली नाही. दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने या हल्ल्यामागे तालिबानचा हात नसल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्ब स्फोट झाला, तेव्हा शाळेला सुट्टी होती. शाळेच्या शिक्षकाने दावा केला आहे की, पहिला ब्लास्ट कारमध्ये झाला, यानंतर एकापाटोपाठ एक दोन स्फोट झाले. असेही वृत्त येत आहे की, हल्ला रॉकेटद्वारे करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अफगानिस्तानचे राष्ट्रपती म्हणाले, या घटनेने सांगून दिले की, तालिबानला मुद्दे सोडवायचे नाहीत, अजून गुंतवायचे आहेत. तर, अमेरिकन राजदूत रोस विलसनने या हल्ल्याची निंदा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हटले की, लहान मुलांवर हल्ला करणे म्हणजे अफगानिस्तानच्या भविष्यावर हल्ला करण्यासारखे आहे. हे खपवून घेतले जाणार नाही.

अमेरिकन सैन्य परत जात असल्यामुळे परिस्थिती बिघडली

20 वर्षे चाललेल्या लांब आणि महाग युद्धानंतर अमेरिकन सैन्य अफगानिस्तानमधून परत आपल्या देशात जात आहे. अल कायदाने 9/11 हल्ला केल्यानंतर 2001 पासून अमेरिकाने अफगानिस्तानमध्ये सैन्य आणले होते. या युद्धात अमेरिकेने 2400 सैनिकांना गमावले. आता देशाची सुरक्षा पुन्हा अफगानिस्तानच्या सैन्याकडे देण्यात आली आहे. अमेरिकन सैन्य परत जात अशल्यामुळे परिस्थिती अजून बिघडण्याचा संशय व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...