आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दयनीय शेजारी:कर्जामध्ये दबला पाकिस्तान; म्हणाला- भारताशी व्यापार व्हावा, सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज

इस्लामाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानला भारताशी व्यापारी संबंध बहाल व्हावेत याची उपरती आली आहे. पाकिस्तानवर विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांचे(भारतीय चलनात) कर्ज आहे. इम्रान सरकारचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रझाक दाऊद म्हणाले, पाकिस्तानला भारतासोबत व्यापारी नातेसंबंध सुरू केले पाहिजेत. असे लवकरात लवकर केले पाहिजे. ऑगस्ट २०१९ पासून दोन्ही देशांत सीमापार व्यापार बंद आहे.

पाकिस्तान अनेक आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांच्या काळ्या यादीत आहे. पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीकडून गेल्या तीन महिन्यांदरम्यान सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पाकिस्तानवर जेवढे कर्ज आहे, ते पुरेसे नाही.

बातम्या आणखी आहेत...