आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश:गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, गाय भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग!

अलाहाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाय भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. म्हणूनच गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित केले जावे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी एका प्रकरणात म्हटले आहे. जावेद नावाच्या व्यक्तीचा जामीन फेटाळताना हा आदेश दिला. जावेदवर उत्तर प्रदेशात गोहत्या प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गाईच्या कत्तलीचा आरोप होता.न्यायाधीश शेखर कुमार यादव यांचे पिठ म्हणाले, सरकारने संसदेत एक विधेयक आणले पाहिजे. त्यात गाईला मौलिक अधिकार द्यावे आणि राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केले जावे.

सोबतच गायीला नुकसान पोहोचवणाऱ्यांना शिक्षा देणारा कायदा तयार केला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. गोरक्षा केवळ एका धर्माचे काम नाही. किंबहुना गाय भारताची संस्कृती आहे. संस्कृतीला वाचवणे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भलेही त्याचा कोणताही धर्म असो. गाईचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. आरोपी जावेदचा जामीन फेटाळताना कोर्टाने टिप्पणी केली. विविध धर्माचे लोक एकत्र नांदतात असा भारत जगातील एकमेव देश आहे. प्रत्येकाची आराधनेची पद्धती वेगवेगळी असू शकते. परंतु देशासाठी विचार मात्र एकसमान आहेत.

कोर्ट म्हणाले, देशाच्या एकजुटीसाठी प्रत्येकजण पाऊल टाकत आहे. अशा परिस्थितीत काही लोकांचा आस्था व विश्वास देशहितासाठी नाही. ते अशा प्रकारे देशाला कमकुवत करतात. आरोपीने पहिल्यांदाच हे कृत्य केलेले नाही. या अगोदरही त्याने गो हत्या केली आहे. त्यामुळे सामाजिक सौहार्द्र बिघडले होते. त्यास जामीन मिळाल्यास तो पुन्हा तेच काम करेल, असे कोर्टाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...