आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Decline In Living Standards In US Cities | Average Age Of Citizens Living In Mountainous, Rural Areas Is 25 Years Older!

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेतील शहरांमध्ये जीवनमानात घट; पण डोंगराळ, ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे वय सरासरी 25 वर्षे जास्त!

वृत्तसंस्था | न्यूयॉर्क21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरासरी कमाल वय कमी होत असल्याने चिंता, सध्या ७६ वर्षे, १९९६ नंतर सर्वात कमी

जगातील सर्वात विकसित देश अमेरिका वेगाने घटणाऱ्या जीवनमानाच्या समस्येला ताेंड देत आहे. सरासरी जीवनमान ७६ वर्षे एवढे झाले आहे. ते १९९६ नंतर सर्वात कमी आहे. शिवाय विकसित देशांपैकी प्रमाण कमी आहे. त्यामागे काेविड महामारी, शहरी जीवनशैली, बंदूक हिंसाचारासारखी कारणे असल्याचे मानले जाते. अमेरिकेतील २५ काैंटीच्या तुलनात्मक अध्ययनात सरासरी जीवनमानात घट हाेत असल्याची बाब समाेर आली.

३४ वर्षांत डाेंगराळ, दुर्गम आणि ग्रामीण भागात वास्तव्य असलेल्यांच्या सरासरी वयात मात्र १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत जास्त जीवनमान असलेले १० काैंटीपैकी ८ डाेंगराळ भाग आहेत. येथील नागरिक सामान्य अमेरिकी व्यक्तींच्या तुलनेत २५ वर्षे जास्त जीवन जगतात. सर्वाधिक जीवनमानाच्या बाबतीत काेलाेराडाे संपूर्ण नागरिकांचे नेतृत्व करत आहे. हा मासेमारी करणारा समुदाय आहे. या मच्छीमारांची तीन हजार घरे आहेत. या समुदायाचे लाेक १०० वर्षांहून जास्त जगतात. त्यानंतर कॅलिफाेर्नियाच्या माेनाे काैंटीचा क्रमांक लागताे. तेथील लाेकांचे जीवनमान १०० वर्षांहून जास्त आहे. अमेरिकेच्या लुइव्हिले विद्यापीठातील संशाेधकांनी आपल्या संशाेधनात दीर्घायूचा थेट संबंध ग्रामीण जीवनाशी असल्याचे म्हटले आहे. येथील नागरिक स्वच्छ हवेत जगतात.

परिश्रम करतात. शहरांच्या तुलनेत येथे तणावही खूप कमी असताे. म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे निराेगी व दीर्घायू जगतात. लठ्ठपणा, धूम्रपान, बेराेजगारी, आराेग्यदायी भाेजनाची उपलब्धता, हवा-पाण्याची गुणवत्ता, उत्पन्नातील असमानता इत्यादी घटक संशाेधनात समाविष्ट हाेते. त्याशिवाय १३ वर्षांपर्यंत ५० लाखांहून जास्त कर्कराेग्यांची इतिहासही अभ्यासण्यात आला. शहरी जीवनात वेगाने वाढणारा तणाव जीवनमानात घट हाेण्यामागील प्रमुख कारण हाेय. दीर्घायुष्याचा थेट संबंध उत्पन्न आणि चांगल्या आराेग्य सेवेशी संबंधित आहे. सरासरी ८१ लाखांवर वार्षिक उत्पन्न असलेले लोक ९४ वर्षांपर्यंत जगण्याची आशा करू शकतात.

येथील दीर्घायूचे रहस्य : भुकेपेक्षा थाेडे कमी भाेजन, तणावरहित जीवन, पुरेशी झाेप

अमेरिकेत काेलाेराडाे, अलास्का, कॅलिफाेर्निया, दक्षिण डकाेटा, व्हर्जिनिया, उत्तर डकाेटा, माेंटाना, टेक्सास, वाॅशिंग्टन, फ्लाेरिडा व उटामध्ये सरासरी वय सर्वाधिक आहे. त्यात बहुतांश काैंटी ग्रामीण भागातील आहेत. येथ ८ हजारांहून कमी लाेक वास्तव्य करतात. तज्ज्ञ म्हणाले, या भागांतील दीर्घायूमागे अनेक घटक आहेत. उदाहरणार्थ खानपान आहे. येथील नागरिक भुकेपेक्षा थाेडे कमी भाेजन करतात. कमी कॅलरी घेतल्यामुळे वय वाढीचा वेग मंदावताे. येथील जीवनात मनाेरंजन एक प्रमुख घटक आहे. बहुतांश लाेक तणावरहित चांगली झाेप घेतात. दिनचर्येत शारीरिक कामांचा समावेश असताे. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी हाेते.